आठवड्याचे राशीभविष्य! ४ ते १० जून, 2023: प्रेमात सफलता, अनोळखी लोकांपासून सावधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 07:59 AM2023-06-04T07:59:41+5:302023-06-04T08:05:19+5:30

Astrology, Rashi Bhavishya: कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

या सप्ताहात ७ जून रोजी बुध वृषभ राशीत जाईल. बाकी कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- मेष राशीत बुध, गुरु, रोहू आणि हर्षल आहेत. बुधवारी बुध मेषेतून वृषभ राशीत जाईल. तेथे त्याची युती रवीशी होईल. मंगळ आणि शुक्र कर्क राशीत आहेत. केतू तूळ राशीत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीतून राहील. या सप्ताहात बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे. शुक्रवारी सकाळी ६:०३ पासून पंचक सुरु होत आहे. शनिवारी पण पंचक राहील. रविवार, दि. ४ जून २०२३ रोजी ज्येष्ठ शुक्ल पौर्णिम (सकाळी ९:१२ पर्यंत) राहील. दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ३:२३ पर्यंत ज्येष्ठा तर त्यानंतर मूळ नक्षत्र राहील, दुसया दिवशी उत्तर रात्री ३:२३ पर्यंत वृश्चिक तर त्यानंतर धनूं रास राहील. दिवस सामान्य आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील.

भाग्य साथ देईल या सप्ताहात आपल्याला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. मनात आनंदी विचार राहतील. नवीन काही तरी करून दाखवण्याची ऊर्मी राहील. नवीन किंवा जुन्या ओळखीतून चांगल्या संधी मिळतील. भाग्याची साथ तुम्हाला मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. घरात लगबग सुरु राहील. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांची प्रगती होईल. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

व्यवसायात सतत व्यस्त राहाल. विविध प्रकारच्या योजना आखल्या जातील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मौजमजा करण्याच्या दृष्टीने प्रवास होईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूचे विवाह ठरतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. समाजात तुमचा मान वाढेल. भेटवस्तू प्राप्त होतील. करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घ्याल. टीप- रविवार, बुधवार, करा. गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

काही फायदे होतील संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही कामे सोप्या रीतीने पार पडतील, तर एखाद्या कामात विलंब होईल. एकंदरीत सकारात्मक परिणाम जास्त मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. लोकांचे व नातेवाईक मंडळींचे सहकार्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तसेच वाहनाची दुरुस्ती वेळीच करून घ्या. मुलांची काळजी घ्या. त्यांच्याशी बोलून मन मोकळे टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस

प्रगतीच्या दृष्टीने काही संकेत मिळू शकतात. मात्र वेगवेगळ्या कामात गुंतलेले राहाल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. भेटवस्तू मिळतील. मात्र किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवसायात भरभराट होईल. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ होईल. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च केले जातील. सरकारी कामे होतील. फार दगदग होईल अशी कामे करू नका. वाहने जपून चालवा. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. घरी पाहुणे मंडळी येतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. मुलांना योग्य संधी मिळतील. त्यांचे कौतुक होईल. शैक्षणिक प्रगतीपुस्तक झळकते राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची काळजी घ्या. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. अनावश्यक खर्चाला आवर घाला. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मालाची विक्री चांगली होईल. मात्र फार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. सप्ताहाच्या प्रथम चरणात कामाचा ताण राहील. घरी पाहुणे येतील, विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. वडीलधाया मंडळींचा मान राखा. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. त्यासाठी पैसे आणि वेळ खर्च कराल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. सुखसोयी वाढवून मिळतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. सोप्या रीतीने कामे पूर्ण होतील. त्यासाठी फार दगदग करण्याची गरज पडणार नाही. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. आवडते खाद्यपदार्थ खाण्यास मिळतील. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. विवाहेच्छूना अनुकूल काळ आहे. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. नोकरीत बदलीची शक्यता आहे. व्यवसायात भरभराट होईल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.

सप्ताहाची सुरुवात थोडी चाचपडत होईल. मात्र, हळूहळू अडचणी दूर होतील. विविध क्षेत्रांत यश मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. विवाहेच्छूचे विवाह ठरेल. मनात प्रसन्न विचार राहतील. आत्मविश्वासाने वाटचाल सुरु राहील. काहींना प्रवास घडून येईल. व्यवसायात सत्त कार्यरत राहावे लागेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे आर्थिक निर्णय बरोबर ठरतील. मुलांशी सौहार्दाचे संबंध ठेवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. टीप सोमवार, मंगळवार, बुधवार, - शुक्रवार चांगले दिवस.

धनलक्ष्मीची कृपा राहील : सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर, बचत होणार नाही. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात सफलता मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. तरुण वर्गाला आनंददायक निरोप येतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. सुखसोयी वाढवून मिळतील. मुलांची प्रगती होईल. टीप - रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

विविध लाभ होतील : धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. अनेकविध लाभ होतील. महत्त्वाचे निरोप येतील. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पात यश मिळेल. मित्र- मैत्रिणींची चांगली साथ राहील. उत्तरार्धात प्रवासात सतर्क राहा. नीट नियोजन करा. अनोळखी लोकांपासून सावध राहा. तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. सोशल मीडियावर सावधानता बाळगणे आवश्यक आहे. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

तुमच्या समोरील अनेक छोट्या-मोठ्या अडचणी दूर होतील. भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. सामाजिक कार्यात तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी राहील. नावलौकिकात भर पडणाच्या घटना घडतील. काहींना पुरस्कार जाहीर होतील. मुलांची प्रगती होईल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. घरी पाहुणे मंडळी येतील. आर्थिक आवक चांगली राहील. त्याच प्रमाणात खर्चपण कराल. व्यावसायिकांना चांगला काळ आहे. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस. -विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)