तुमचे पैसे अडकलेत?, तर एकदा करून पाहा ज्योतिषशास्त्रातील 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:14 PM2022-06-08T18:14:09+5:302022-06-08T18:24:21+5:30

आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते, ज्यात एखाद्याला दिलेले पैसे अडकून पडण्याची किंवा बुडण्याचीही वेळ येते.

आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते, ज्यात एखाद्याला दिलेले पैसे अडकून पडण्याची किंवा बुडण्याची वेळ येते. एखाद्याला मदत म्हणून किंवा अडचणीच्या वेळी आपण पैसे उसने देतो. मात्र काही वेळेस ते पैसे परत मिळतील याची शास्वती नसते.

ज्योतिषशास्त्रात माणसांच्या अडीअडचणींवर आर्थिक बाबींबाबत तसेच धनसंपत्तीच्या स्थितीबाबत अंदाज वर्तवले जाऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्यानं जुनी येणी, अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग जुळून येऊ शकतात. अशा वेळी कोणते उपाय करता येतील ते पाहू.

शनिवारी हनुमानाच्या प्रतिमेसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यावर मोहरी, दोन लवंगा आणि एक कापूर यांचा धूप करावा. यानंतर बजरंग बाणचे तीन वेळा पाठण करा आणि त्यांच्यासमोर तुमच्या अडकलेल्या पैशाबाबत प्रार्थना करा.

शुक्रवारी लुबानमिश्रित कापराचा धूप करा. त्यानंतर सायंकाळी लक्ष्मी देवीसमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा दाखवून मनोभावे प्रार्थना करावी. देवीच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत गुरु आणि शुक्र बलवान असतात तेव्हा धनप्राप्तीचे योग बनू लागतात. अशा परिस्थितीत माणूस कमी वेळात खूप यशस्वी होतो. तसेच कुंडलीत अशी स्थिती निर्माण झाल्यावर अडकलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळतात. त्यामुळे तुमचे जीवन यशस्वी करण्यासाठी गुरू आणि शुक्र या ग्रहांना बळ द्या. तसेच बुधवारी गणरायाची पूजा करून अथर्वशीर्षाचे पठण करावे.

तांब्याच्या भांड्यात सिंदूर टाकून रोज उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. हा उपाय परताव्यासाठी प्रभावी मानला जातो. याशिवाय श्री सूक्ताचे पठण करावे आणि गणेश लक्ष्मी रुद्राक्ष धारण करावे. (टीप - सदर माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून यासंदर्भात तज्ज्ञ जाणकार व्यक्तींशी सल्लामसलत करणे अतिशय उपयुक्त ठरू शकेल.)