घरातील तुळस सुकत असल्यास त्याचा अर्थ काय? जाणून घ्या संकेत, मोठं नुकसान टळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:37 PM2022-03-14T15:37:01+5:302022-03-14T15:41:20+5:30

घरात लावलेलं तुळशीचं रोप सुकत असल्यास त्याचा अर्थ काय? त्यातून कोणते संकेत मिळतात?

हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. तुळशीचं रोप हिंदब धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. पूजा करताना तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. घरात तुळशीचं रोप असल्यास सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे.

तुळशीचं रोप रोगांचा नाश करतं आणि प्रत्येक त्रासातून वाचवतं, असं धर्मशास्त्र सांगतं. तुळशीत अनेक औषधी गुण आहेत. तुळशीचा संबंध घरातील सुख, समृद्धी आणि संपदा यांच्याशी आहे.

वास्तूमध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीचं रोप भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल महत्त्वाचे संकेत देत असतं. तुळशीचं लहानसं रोप येणाऱ्या संकटांबद्दल संकेत देतं.

घरात असलेलं तुळशीचं रोप अचानक सुकून गेल्यास भविष्यात काहीतरी अडचण येणार असल्याचं समजून जा. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीचं रोप बुध ग्रहाशी संबंधित असतं. बुध ग्रहाच्या प्रभावानं तुळशीचं रोप सुकत असल्याचं म्हटलं जातं.

तुळशीचं रोप अनेकदा पितृदोषामुळेही सुकत असल्याचं म्हणतात. घरात पितृदोषाचा प्रकोप असल्यास तुळशीचं रोप वारंवार सुकून जातं.

तुळशीच्या रोपाजवळ एखाद्या पक्षानं घरटं तयाप केल्यास कुंडलीतील केतूची स्थिती बिघडल्याचं समजा. योग्य वेळी यासंदर्भात उपाय करा.

बुध ग्रहाला धन आणि व्यापाराचा स्वामी म्हटलं जातं. बुधची स्थिती खराब झाल्यास तुमची आर्थिक स्थिती खराब होण्यास सुरुवात होऊ शकते. तुळस छतावर ठेवल्यास ती कमजोर होते.