घर सजावताना आपण पडदे, चादरी, सोफासेट इ गोष्टींबरोबरच सुंदर, आकर्षक चित्रांचा भिंतीच्या सजावटीसाठी वापर करतो. ही चित्रे कोणाचेही चित्त वेधून घेतात आणि प्रसन्नता निर्माण करतात. त्यामुळे केवळ भिंत सजते असे नाही, तर त्याचा वापर घरात सकारात्मक ऊर्जा निर्मितीसाठीदेखील होतो. अशा चित्रांची रंगसंगती आणि दिशा यांचा वास्तुशास्त्रातील नियमानुसार निवड केली, तर ते वास्तूसाठी अधिक लाभदायक ठरू शकते. पाहूया कोणत्या दिशेला कोणती फ्रेम आकर्षक आणि परिणामकारक ठरेल.