International Yoga Day 2021 : योगासनांचा तुमच्या कुंडलीतील ग्रहांवर होणारा सकारात्मक परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:00 AM2021-06-21T08:00:00+5:302021-06-21T08:00:02+5:30

आपल्या नशिबावर ज्याप्रकारे ग्रहांचा मोठा प्रभाव असतो, त्याचप्रकारे आपल्या आरोग्यावरही ग्रहांचा प्रभाव असतो.ग्रहांची अनुकूलता ठीक नसेल, तर आरोग्याच्या तक्रारी सुरू राहतात आणि व्यक्तीला काही ना काही आजार होत राहतो. अशा परिस्थितीत आपण योगाभ्यासाद्वारे ग्रहांचे अशुभ परिणाम कसे थांबवू शकतो आणि निरोगी शरीर कसे मिळवू शकतो हे जाणून घेऊ. योगासने करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते. म्हणून जागतिक योग दिनाच्या मुहूर्तावर योगाभ्यासाची सुरुवात करा.

जर कुंडलीत सूर्य कमकुवत असेल तर त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. तसेच , व्यक्तीस दृष्टी समस्या किंवा हृदयविकाराचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी अनुलोम-विलोम आणि भस्त्रिका प्राणायाम यांच्याबरोबर सूर्य नमस्कार देखील रोज करावा.

कुंडलीत चंद्र कमजोर असल्यास एखादी व्यक्ती खूप भावनिक होते. तसेच, अशा स्थितीतील चंद्रामुळे नेहमीच तणाव आणि अस्वस्थता जाणवत राहते. अशा व्यक्तींना नेहमीच सर्दी-थंडीचा त्रास असतो. चंद्राला बळकटी देण्यासाठी दररोज सकाळी ओमचा अनुलोम-विलोम प्राणायाम करावा.

जन्मकुंडलीतील मंगळ नकारात्मक असल्यास अर्थात अनुचित स्थानी नसल्यास व्यक्तीचे स्वरूप नकारात्मक होते. हे एकतर आपल्याला अधिक सक्रिय किंवा अधिक आळशी बनवते आणि या दोन्ही परिस्थिती कोणालाही चांगल्या नसतात. मंगळ शुभ करण्यासाठी पद्मासन, फुलपाखरू आसन, मयूर आसन आणि श्वसनाचे प्राणायाम दररोज करावे.

कुंडलीतील बुधाचा नकारात्मक प्रभाव एखाद्या व्यक्तीची निर्णय शक्ती कमकुवत करतो. याशिवाय ती व्यक्ती त्वचेच्या आजारांनाही बळी पडते. बुध शुभ बनविण्यासाठी दररोज भस्त्रिका, भ्रामरी आणि अनुलोम-विलोम प्राणायाम करावे.

जर कुंडलीत बृहस्पति कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला यकृताचा त्रास होऊ शकतो. गुरुबल कमी असेल तर लठ्ठपणा आणि मधुमेह हे विकार होऊ शकतात. गुरूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार व कपालभातीसह सर्वांगासन दररोज करावे. याचा बराच फायदा होईल.

शुक्राच्या कमकुवतपणामुळे एखाद्या व्यक्तीला जननेंद्रियाची समस्या उद्भवू शकते. यामुळे, गरोदरपणातही समस्या उद्भवते. शुक्राला बळकटी देण्यासाठी धनुरासन, हलासन, मूलबंध आणि जानूसिरसन क्रिया नियमित करा.

कुंडलीत कमकुवत शनी असलेले लोक जठर, संधिवात, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत. शनिला बळकट करण्यासाठी, कपालभाती, अनुलोम-विलोम, अग्निसारा, पवनमुक्तासन आणि भ्रामरी प्राणायाम करा.

बुध प्रमाणेच कमकुवत राहूचा माणसाच्या मेंदूवर आणि विचार करण्याच्या सामर्थ्यावर जास्त परिणाम होतो. याचा परिणाम व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर होतो. राहूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी अनुलोम-अनिलम, भ्रामरी, भस्त्रिका प्राणायाम करा.

कमकुवत केतू अशक्तपणा, मूळव्याध, अपचन आणि त्वचा रोगांना आमंत्रित करते. केतुला बळकट करण्यासाठी अग्निसारा, अनुलोम-अनिलम, कपालभाती प्राणायाम करा. तसेच शीर्षासन करणे देखील उचित ठरू शकते.