४ बड्या ग्रहांचे गोचर: ‘या’ ९ राशींना उत्तम; मानसिक शांतता, सुख-समृद्धी-संधींचा महिना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 09:05 AM2023-01-02T09:05:14+5:302023-01-02T09:16:38+5:30

सन २०२३ चा पहिला महिना तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक आघाडीवर लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

सन २०२३ चे जगभरात अगदी उत्साहात स्वागत करण्यात आले. तरुणाईने विशेष जल्लोष साजरा केला. नवीन वर्षांकडून अनेक आशा-आकांक्षा-अपेक्षा लोकांना आहेत. नवे संकल्प, नव्या इच्छा घेऊन नववर्ष आले आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने सन २०२३ चा पहिला जानेवारी महिना अतिशय महत्त्वाचा आणि खास मानला गेला आहे.

सन २०२३ च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. या महिन्यात शुक्र, सूर्य, शनि, बुध या मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा प्रभाव तुमच्या जीवनावरही दिसून येईल. यातील सर्वांत महत्त्वाचे राशीपरिवर्तन हे शनीचे असणार आहे.

शनीदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. यामुळे साडेसातीचे चक्र बदलणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना व्यवसायात नवीन संधी घेऊन येईल. दुसरीकडे, कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने महिना खूप चांगला जाणार आहे. मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी हा महिना कसा असेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना मानसिक शांतता देणारा ठरू शकेल. मात्र, काही कारणास्तव जोडीदाराशी मतभेद होतील. गैरसमजामुळे नुकसान होऊ शकते. आत्मविश्वासाने समस्यांचा सामना करणे उपयुक्त ठरू शकेल. कोणत्याही वादात पडू नये. स्वाभिमान दुखावणारी घटना घडू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कार्यालयात सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सहकार्य न मिळाल्याने मन उदास होऊ शकेल. अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करणे टाळावे. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. काही घटनांमुळे प्रसन्नता लाभेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला समर्थकांची संख्या वाढलेली दिसेल. प्रतिकूल परिस्थितीतही तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील. सुख-समृद्धीसाठी खर्च करू शकता. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मोठ्या नफ्याची शक्यता आहे. संगीत आणि साहित्याकडे कल वाढेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना संमिश्र ठरू शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. नातेवाईकांचा उपयोग होईल. चुकीच्या निर्णयामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तिसऱ्या आठवड्यात शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राच्या त्रासामुळे तुम्हाला वाईट वाटेल. आर्थिक जोखीम घेऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना नवीन संधी घेऊन येईल. गुरु-कृपा मिळेल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील. नम्रपणे वागणे उपयुक्त ठरू शकेल. वरिष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. परदेशातील करार तुमच्या व्यवसायासाठी खूप चांगले असतील. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना करिअरच्या दृष्टीने खूप चांगला जाणार आहे. कौटुंबिक सुख मिळू शकेल. सर्व इच्छित कामे पूर्ण होतील. प्रतिस्पर्धी तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. अचानक नुकसान होऊ शकते. अनुभवी व्यक्तीचा अनुभव फायदेशीर ठरेल. या महिन्याच्या शेवटी तुम्हाला गुंतवणुकीद्वारे सकारात्मक परिणाम मिळतील.

तूळ राशीच्या व्यक्तींना जानेवारीच्या महिन्यात करिअरमध्ये यश मिळेल. मित्रांचा विशेष पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणावरही टीका करू नका. शरीर आणि मनाला विश्रांती मिळेल. संगीत आणि साहित्यात तुमची आवड वाढेल. जोडीदाराच्या नाट्यमय स्वभावामुळे तुम्ही अडचणीत असाल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना सामान्यपेक्षा थोडा कमी असेल. तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यापारी वर्गाला नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. झटपट पैसे कमविण्याचा प्रयत्न टाळा. अन्यथा फसवणूक होऊ शकते.

धनु राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना आनंदात वाढ करणारा असेल. करिअरसाठी वेळ उत्तम राहील. आर्थिक नुकसान होऊ शकते. घरगुती तणाव संभवतो. आत्मविश्वास कमी होईल. अनुभवी लोकांशी संपर्क साधला जाईल. नकारात्मक वागणुकीमुळे अस्वस्थता राहील. महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात तुमचा थोडा गोंधळ वाढू शकेल. सहकाऱ्यांच्या चुकांमुळे अडचणी निर्माण होतील. महिन्याच्या शेवटी अचानक लाभ संभवतो.

मकर राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात मेहनतीचे फळ मिळू शकेल. खोट्या आरोपामुळे त्रास होईल. मानसिक तणाव राहील. इतरांच्या सल्ल्याचे पालन करताना काळजी घ्या. व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात थोडे सावध राहावे लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. जुनी गुंतागुंतीची प्रकरणे सुटतील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंबाबत काळजी घ्या.

कुंभ राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना आर्थिक स्थितीच्या दृष्टीने मध्यम राहील. मन पैशाच्या बाबतीत अस्वस्थ राहू शकते. मुलगा लांबच्या प्रवासाला जाईल. कौटुंबिक वातावरण मध्यम राहील. या महिन्यात अडथळे येतील पण ते कालांतराने दूरही होतील. महिन्याच्या शेवटी फायदा होण्याची शक्यता आहे. उच्च अधिकार्‍यांशी संबंध सुधारतील. तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.

मीन राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना बुद्धिमत्तेत आणि वाणीत प्रगती करणारा असेल. जुना प्रियकर पुन्हा संपर्कात येऊ शकेल. अनेक चांगले परिणाम मिळतील. एखाद्याचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. कामात अडथळे येऊ शकतात. रखडलेले पैसे मिळण्याचा मार्ग निघेल. मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा, अन्यथा एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. बॉसच्या स्तुतीने उत्साह वाढेल. विनाकारण शंका घेऊ नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.