गुरु-शुक्र युती: ६ राशींवर गजलक्ष्मी कृपा, राजयोगाचा लाभ; पद-पगार वाढ, सुख-समृद्धी वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:03 PM2023-12-11T15:03:03+5:302023-12-11T15:03:03+5:30

गुरु-शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले असले तरी नववर्ष २०२४ मध्ये ६ राशींना भरपूर लाभ मिळवून देऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर महिना सुरू झाला असून, काही दिवसांनी नववर्ष २०२४ ची सुरुवात होईल. नववर्षांत अनेक महत्त्वाचे गोचर, राशीपरिवर्तन होणार आहेत. सर्वांत विशेष म्हणजे गुरु ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. साधारण वर्षभराने गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत विराजमान होतो.

आताच्या घडीला गुरु ग्रह मेष राशीत वक्री आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी मेष राशीत गुरु मार्गी होणार आहे. यानंतर पुढील वर्षी २०२४ च्या मे महिन्यात गुरु मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचा वृषभ प्रवेश महत्त्वाचा मानला गेला आहे. याचा प्रभाव केवळ देश-दुनियेवर नाही, तर सर्व राशींवर पडेल, असे सांगितले जाते.

शुक्र ग्रह १९ मे २०२४ च्या दरम्यान स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि शुक्र एकमेकांपासून केंद्र स्थानी, समसप्तम स्थानी तसेच पहिल्या, चौथ्या स्थानी आले तर गजलक्ष्मी राजयोग जुळून येतो, असे सांगितले जात आहे. गुरु आणि शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत.

गुरु आणि शुक्राची युती वृषभ राशीत होणार आहे. यामुळे गजलक्ष्मी राजयोग जुळून येणार आहे. सन २०२४ मध्ये हा राजयोग काही राशीच्या व्यक्तींना मालामाल करणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी, नोकरी, करिअर तसेच जीवनातील अन्य क्षेत्रांवर या राजयोगाचा विशेष प्रभाव पडू शकेल. लकी राशी कोणत्या? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्ती गजलक्ष्मी राजयोगामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील. ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होईल. नवीन वर्षात कोणत्याही प्रकारच्या गोंधळापासून दूर राहाल. ध्येय साध्य कराल. आरोग्य चांगले राहील. उत्साह वाढेल. कल अध्यात्माकडे असेल. विद्यार्थ्यांसाठी २०२४ हे वर्ष खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. वडील आणि शिक्षक यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.

कर्क राशीच्या व्यक्तींचे गजलक्ष्मी रोजयोगामुळे संवाद कौशल्य प्रभावी होईल. वैयक्तिक जीवनासोबतच व्यावसायिक जीवनातही चांगली कामगिरी कराल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. भावंडांसोबत संबंध चांगले राहतील. एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असाल. विद्यार्थ्यांसाठी वर्ष अतिशय अनुकूल असेल. शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतील. सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांना या वर्षी चांगली बातमी मिळू शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोगामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. काही अडचण असेल तर ती दूर होईल. गजलक्ष्मी राजयोगाने नशीब बदलेल. नोकरीच्या शोधात असाल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत एखाद्या चांगल्या पॅकेजसह इतर कंपनीकडून कॉल येऊ शकतात. करिअरमध्ये प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने मान-सन्मान लक्षणीय वाढेल. नवीन वर्षात बचत करण्यात यशस्वी व्हाल. बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होईल. गुरुकृपेने आई-वडिलांसोबतचे संबंध चांगले राहतील. सेवा करण्याची संधी मिळेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोगामुळे प्रत्येक पावलावर कोणाची तरी साथ मिळेल. योग्य निर्णय घेऊन योग्य दिशेने वाटचाल करत राहतील. घरातील वातावरण आनंदाने भरलेले असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही समस्या सुरू असतील तर त्यातून दिलासा मिळू शकेल. पालक आपल्या मुलांसोबत आनंदी राहतील. भावंडांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्याल. कुटुंबातील सदस्याचा विवाह निश्चित होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत बसण्याचा विचार करत असतील तर परीक्षेत उत्कृष्ट परिणाम मिळतील.

धनु राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. गजलक्ष्मी राजयोगामुळे उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आत्तापर्यंत ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ते नवीन वर्षात पूर्ण होताना दिसत आहेत. व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. नवीन करार होण्याची शक्यता आहे. मोठा नफा मिळण्याची शुभ शक्यता आहे. नवीन वर्षात काही खास लोक भेटू शकतात, जे वर्षभर मदत करतील. कामे सहज पूर्ण होतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखून काम कराल.

मीन राशीच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोगामुळे आगामी वर्ष आनंददायी ठरणार आहे. नोकरदारांना चांगली वेतनवाढ मिळेल. पगारही वाढेल. नवीन वर्षात नवीन घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. घरगुती जीवन उत्कृष्ट राहील. व्यापारी आपला व्यवसाय वाढवू शकतील. प्रचंड नफा मिळवून खूश होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. खूप प्रेम आणि आपुलकी मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.