Guru Asta 2022: शनीच्या राशीत गुरुचा अस्त: ‘या’ लोकांनी राहावे अखंड सावधान; काय करु नये? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:12 PM2022-02-08T14:12:05+5:302022-02-08T14:16:26+5:30

Guru Asta 2022: गुरु अस्त कालावधीत कोणते उपाय करावेत? काय काळजी घ्यावी? पाहा, डिटेल्स...

ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास फेब्रुवारी महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. या एकाच महिन्यात नवग्रहातील ६ ग्रह स्थिती बदल करणार आहेत. नवग्रहातील देवगुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह फेब्रुवारी महिन्यात अस्त होणार आहे. ही घटना महत्त्वाची मानली गेली आहे. (Guru Asta 2022)

गुरु हा संपन्नता, विवाह, वैभव, विवेक, धार्मिक कार्य यांचा कारक ग्रह मानला गेला आहे. गुरु अस्त होणे ही एक खगोलीय घटना असली, तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. गुरुचा अस्त होणे म्हणजे गुरु सूर्य ग्रहाच्या अतिशय जवळून मार्गक्रमण करतो. (jupiter combust 2022 in aquarius)

आताच्या घडीला गुरु ग्रह शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. तर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीतून १३ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे गुरुचा अस्त होणार आहे. मात्र, गुरुचा अस्त फारसा चांगला मानला जात नाही. (guru asta in kumbha rashi 2022)

गुरु ग्रह शनीच्या कुंभ राशीत २३ फेब्रुवारी रोजी अस्त होत आहे. सुमारे एक महिन्याच्या कालावधीनंतर गुरु उदय होईल. या कालावधीत धार्मिक कार्ये, शुभ कार्ये करणे वर्जित मानले गेले आहे. यामुळे वास्तु शांती, गृहप्रवेश अशी कार्ये करण्यासाठी या कालावधीत मुहूर्त देण्यात आलेले नाहीत. (guru combust 2022)

गुरुच्या अस्ताचा केवळ बारा राशीच्या व्यक्तींवर नाही, तर संबंध पृथ्वीवर त्याचा प्रभाव दिसून येईल, असे सांगितले जात आहे. सोन्याच्या किमतीत मोठे चढ उतार पाहायला मिळू शकतात, असेही म्हटले जाते. शेअर मार्केटवरही याचा प्रभाव दिसून येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

गुरु अस्ताचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येऊ शकतो. नकारात्मकता वाढू शकते. परदेशातील व्यवहारांवर प्रभाव दिसून येऊ शकतो. सरकारला अनेक निर्णय पूर्णविचारांती घ्यावे लागतील, असे सांगितले जात आहे.

गुरु अस्ताचा सर्वाधिक प्रभाव कर्क, धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींवर दिसून येऊ शकतो. या कालावधीत या तीनही राशीच्या व्यक्तीनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. खर्चावर नियंत्रण ठेवावे. बोलताना विचार करून व्यक्त व्हावे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांना सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घ्याावा. आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे.

मात्र, गुरु अस्ताचा वृषभ, मिथुन, कन्या आणि तूळ या राशीच्या व्यक्तींना हा कालावधी अत्यंत सुखद जाऊ शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. मिळकतीचे नवे स्रोत प्राप्त होऊ शकतील. कुटुंबासोबतचा काळ आनंदात जाईल. करिअरमध्ये यश आणि प्रगतीच मार्ग साध्य करू शकाल, असे सांगितले जात आहे.

गुरु अस्त कालावधीत प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी गुरु संबंधी उपाय करण्याचा सल्ला दिला जात आहे. पिवळ्या वस्तूंचे दान करावे, पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. तसेच योग, ध्यानधारणा करावी. गुरुजनांचा सन्मान करावा. गुरुवारी गुरु ग्रहाच्या मंत्राचे पठण करावे, असे काही उपाय करणे उपयुक्त असल्याचे सांगितले गेले आहे.