३१ डिसेंबरला गुरु मार्गी: ५ राशींचा भाग्योदय काळ, लाभच लाभ; पद-पैसा वृद्धी, ४ महिने समृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 02:32 PM2023-12-15T14:32:09+5:302023-12-15T14:46:22+5:30

३१ डिसेंबरला मार्गी होत असलेला गुरु काही राशींना आर्थिक आघाडीवर उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, सन २०२३ ची सांगता आणि सन २०२४ ची सुरुवात विशेष ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. याचा लाभ नववर्षातही मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह सन २०२३ च्या शेवटच्या दिवशी मार्गी होत आहे.

आताच्या घडीला गुरु ग्रह मेष राशीत आहे. याच राशीत वक्री असलेला गुरु ३१ डिसेंबर रोजी मार्गी होत आहे. सन २०२४ च्या सुरुवातीला गुरु मेष राशीत असणार आहे. गुरुचे गोचर ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते. पहिल्या चार महिन्यांत गुरुची सिंह राशीवर पाचवी, तूळ राशीवर सातवी आणि धनु राशीवर नववी दृष्टि असेल. यामुळे काही राशींना गुरुची शुभफले मिळू शकतात, असे म्हटले जात आहे.

३१ डिसेंबरला मेष राशीत मार्गी झालेला गुरु ४ महिन्यांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. २०२४ मध्ये मेष राशीतील गुरुचे गोचर ५ राशींना अतिशय उत्तम लाभदायक ठरू शकते. तर काही राशींसाठी आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो. मेष ते मीन या सर्व राशींवर गुरु मार्गी होण्याचा प्रभाव कसा असेल ते जाणून घेऊया...

मेष: गुरु मार्गीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. शारीरिक आणि मानसिक तणावातून जावे लागेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणार आहे. तसेच या काळात धार्मिक कार्यात जास्त रस असेल.

वृषभ: गुरु मार्गीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक स्थिती डगमगू शकते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. याव्यतिरिक्त, घरगुती आणि व्यवसायाशी संबंधित गुंतागुंतांमुळे अधिक तणाव जाणवू शकतो.

मिथुन: २०२४ ची सुरुवात खूप शुभ आणि फलदायी ठरू शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभेल. लाभ आणि प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. वाहन व मालमत्तेचे सुख मिळेल. सर्व कामात यश मिळेल.

कर्क: संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संघर्षमय काळातून जाणार आहात. मिळकत सामान्य राहिली असली तरी खर्च जास्त असतील. कोणत्या ना कोणत्या समस्यांमुळे तणावाखाली असाल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

सिंह: गुरु ग्रह शुभ फळ देईल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना हा काळ अनुकूल असणार आहे. करिअरमध्ये एकामागून एक यश मिळेल. स्वभाव अतिशय धार्मिक असेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

कन्या: गुरु मार्गीचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक परिस्थिती निराशाजनक असू शकेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असणार आहे. व्यवसायात गुंतागुंत वाढेल. मानसिक ताण खूप असेल. एखाद्या गोष्टीच्या गुप्त चिंतेमुळे त्रस्त होऊ शकता. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

तूळ: विशेष परिश्रम केल्यावरच उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करू शकाल. वाहन सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याबाबत निष्काळजी राहणे महागात पडू शकते. आरोग्याची अधिक काळजी घ्या.

वृश्चिक: विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खर्च वाढेल, पण उत्पन्न मर्यादित राहील. कर्जही घ्यावे लागू शकते. शत्रूंपासूनही थोडे सावध राहा. नियोजित कामात अडथळे येऊ शकतात. जास्त धावपळ करावी लागेल. आरोग्याची अधिक काळजी घ्या.

धनु: शुभ कार्यात पैसा खर्च करू शकता. उच्च शिक्षण घेण्यात यशस्वी व्हाल. शिक्षणाशी संबंधित निकाल सकारात्मक लागतील. कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. नशिबाने साथ दिल्याने प्रगतीची दारे खुली होतील.

मकर: कमी आराम आणि अधिक संघर्ष करावा लागू शकेल. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिक स्थिती समस्या निर्माण करू शकते. वाहन संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागेल. उत्पन्न सामान्य राहील.

कुंभ: उत्पन्न सामान्य राहील. खर्चात अचानक वाढ होईल. बजेटवर परिणाम होऊ शकतो. आरोग्याबाबत अजिबात बेफिकीर राहू नका. घरगुती प्रकरणांमुळे सतत गोंधळ आणि तणावाची स्थिती राहील.

मीन: अतिशय शुभ परिणाम मिळू शकेल. अत्यंत प्रतिष्ठित लोकांशी परिचय होऊ शकेल. लांबचा प्रवास करण्याची शक्यता आहे. चांगले पैसे मिळतील. पैसा शुभ कार्यात खर्च करता येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.