२७ दिवसांनंतर गुरुचा उदय: ५ राशी भाग्यवान ठरणार, गुरुकृपा लाभणार; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:07 AM2023-04-25T07:07:07+5:302023-04-25T07:07:07+5:30

मेष राशीत गुरुचा उदय होणार असून, कोणत्या राशींना गुरुदर्शनाचा शुभ-लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह मेष राशीत उदय होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी गुरुने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. ३१ मार्च रोजी गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत असताना अस्तंगत झाला होता. अस्तंगत अवस्थेत असताना गुरु मेष राशीत विराजमान झाला. यानंतर आता सुमारे २७ दिवसांनी गुरु मेष राशीत उदय होत आहे. (guru uday mesh rashi 2023)

एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. ३१ मार्च रोजी गुरु आणि सूर्य अगदी जवळच्या अंशांवर होते. त्यामुळे गुरु दिसेनासा झाला. म्हणजेच अस्तंगत झाला. (jupiter rise aries april 2023)

तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते. आताच्या घडीला मेष राशीत सूर्य आणि गुरु आहेत. मात्र, हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून लांबच्या अंतरावर गेले आहेत. त्यामुळे आता सुमारे २७ दिवसांनी म्हणजेच २७ एप्रिल रोजी गुरु ग्रह पुन्हा दिसू लागेल. म्हणजेच गुरुचा उदय होऊन गुरुदर्शन घडेल.

विशेष म्हणजे गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर गुरुदर्शन होणार असून, हा योग अतिशय शुभ मानला गेला आहे. गुरु अस्तंगत असताना शुभ कार्ये केली जात नाहीत. आता गुरु उदय झाल्यावर पुन्हा एकदा शुभ कार्यांना प्रारंभ होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. गुरुचा उदय म्हणजेच मेष राशीत होणारे गुरुदर्शन ५ राशींसाठी शुभ-लाभदायी मानले गेले आहे. जाणून घेऊया...

मेष राशीत सूर्य, बुध, गुरु आणि राहु ग्रह विराजमान आहेत. या राशीत गुरुचा उदय होत आहे. आगामी काळ करिअरसाठी फलदायी ठरू शकेल. बढतीची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी कामासाठी प्रोत्साहन देऊ शकतील. नवीन लोकांशी परिचय होऊ शकेल. काही मोठा आर्थिक लाभही मिळू शकतो. आर्थिक आघाडीवर गुरूचा उदय अत्यंत फायदेशीर ठरू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुचा उदय लाभदायक ठरू शकेल. पैसे कमवण्याचे काही मार्ग खुले होऊ शकतील. व्यावसायिकांसाठीही दिवस चांगले येऊ शकतील. भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी फायदेशीर काळ ठरू शकेल. बढतीची शक्यता आहे. कमी वेळात जास्त नफा मिळू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना राशीच्या व्यक्तींना गुरुचा उदय अनुकूल ठरू शकेल. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. उत्साहाने काम करू शकाल. आत्मविश्वास वाढू शकेल. कामाच्या ठिकाणी पदाचा आणि प्रतिष्ठेचा फायदा घेऊ शकाल. नशिबाच्या पाठिंब्यामुळे पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकेल. चांगल्या संधीही मिळू शकतील.

धनु राशीच्या व्यक्तींना राशीच्या व्यक्तींना गुरुचा उदय फलदायी ठरू शकेल. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनुकूल काळ आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. पदोन्नतीची शक्यता निर्माण होत आहे. लव्ह लाइफही खूप चांगली जाऊ शकेल. काही नवीन गोष्टींबद्दलही माहिती मिळेल.

मीन राशीच्या व्यक्तींना राशीच्या व्यक्तींना गुरुचा उदय सकारात्मक ठरू शकेल. मीन राशीचाही स्वामी गुरु आहे. नोकरीच्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक करु शकाल. घरात काही शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतील. आर्थिक स्थितीही चांगली राहू शकेल. पैसे कमवण्यात, गुंतवणूक करण्यात यशस्वी होऊ शकाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.