गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 07:07 AM 2023-04-22T07:07:07+5:30 2023-04-22T07:07:07+5:30
guru gochar in ashwini nakshatra april 2023: मेष राशीसह गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश काही राशींना उत्तम तर काहींना संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला वरचे स्थान आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुरु अश्विनी नक्षत्रात प्रवेश करत आहे. एक दिवस आधी म्हणजेच २१ एप्रिल रोजी गुरु स्वराशीतून म्हणजेच मीन राशीतून मेष राशीत विराजमान झाला आहे. सुमारे वर्षभर गुरु ग्रह मेष राशीत विराजमान होणार आहे. सद्य स्थितीत अस्तंगत असलेला गुरुचा एप्रिल महिन्याच्या अखेरीस उदय होणार आहे. (jupiter transit ashwini nakshatra april 2023)
अक्षय्य तृतीयेला म्हणजेच २२ एप्रिल रोजी गुरु अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. २१ जून २०२३ पर्यंत गुरु अश्विनी नक्षत्रााच्या पहिल्या चरणात विराजमान असेल. यानंतर गुरु वक्री होणार आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अलीकडेच नवग्रहांचा राजा सूर्यही अश्विनी नक्षत्रात विराजमान झाला आहे. (guru gochar in ashwini nakshatra april 2023)
गुरुचा अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीतील प्रवेश अतिशय शुभ मानला गेला आहे. याचा सर्व राशींसह देश-दुनियेवर प्रभाव पडताना दिसू शकेल, असे म्हटले जात आहे. गुरुचा अश्विनी नक्षत्रात होणारा प्रवेश ७ राशींना सर्वोत्तम फलदायी, शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तर काही राशींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश संमिश्र ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...
मेष राशीत गुरु विराजमान झाला आहे. गुरुच्या अश्विनी नक्षत्रातील प्रवेश नोकरी आणि व्यवसायात शुभ परिणाम देणारा ठरू शकेल. आर्थिक लाभ मिळू शकतील. रखडलेले पैसेही मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळू शकेल. पुढील मार्ग सोपा होताना दिसत आहे. भेटवस्तू मिळू शकतील. जोडीदाराची काळजी घ्या.
वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश लाभदायक ठरू शकेल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. भेटवस्तूही मिळू शकतात. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात. हितशत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. संयमाने काम करावे.
मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश अनुकूल ठरू शकेल. नोकरी-व्यवसायात बरीच धावपळ करावी लागू शकेल. कालांतराने लाभ मिळू शकतील. नोकरीसंदर्भात काही इतर ऑफर मिळू शकतात. व्यवसाय पुढे नेण्यास मदत होऊ शकेल. सरकारी उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतील. अश्विनी नक्षत्रात गुरूचा प्रवेश कार्यक्षेत्रासाठी चांगला ठरू शकेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्या.
कर्क राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. काही गोष्टी सुलभपणे पार पडू शकतील. वैयक्तिक जीवनात आणि कामात फायदा होऊ शकेल. संपत्ती वाढीचा योग जुळून येऊ शकतील. जोडीदारासोबत वस्तू खरेदी करू शकाल. एखादी खास भेटही मिळू शकते. कठोर परिश्रम करावे लागतील. यश मिळू शकेल. सरकारी नोकऱ्या असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरू शकेल. संयम बाळगा. रागावर नियंत्रण ठेवावे.
सिंह राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन नोकरीचा योग जुळून येऊ शकेल. मात्र, नव्या ठिकाणी कामाचे वा नोकरीचे समाधान मिळेलच असे नाही. कुठेही बदली होऊ शकते. व्यावसायिकांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी कोणताही नवीन निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करणे हिताचे ठरू शकेल.
कन्या राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबातील नातेसंबंधांवरही परिणाम होऊ शकतो. नोकरदारांवर ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असू शकेल. वैवाहिक संबंधांमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. सासरच्या लोकांशी पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी सारासार विचार करणे हिताचे ठरू शकेल. परदेशातून काम करणाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनाही जास्त मेहनत करावी लागू शकते.
तूळ राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश शुभ प्रभाव ठरू शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. फायदे मिळू शकतात. पदोन्नतीची शक्यता आहे. नवीन कंपनीत बढती मिळू शकते. कामाची आणि कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट टाळला पाहिजे. कुटुंबाच्या बाबतीत कोणताही निर्णय विचार करूनच घ्या. अन्यथा नुकसान होऊ शकते.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. सर्व कामे काळजीपूर्वक करावे. व्यवसायात सावध राहून कोणताही निर्णय घ्यावा. कोणतेही नवीन काम सुरू न करणे हिताचे ठरू शकेल. कोणताही प्रकल्प सुरू करणे टाळा. परदेशातून नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नफा वाढू शकेल.
धनु राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश शुभ ठरू शकेल. नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळू शकेल. शुभ योग व्यापारी वर्गाच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकेल. लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकेल. व्यवसायात लाभाची टक्केवारी वाढू शकेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळ अनुकूल ठरू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळू शकेल. उत्साह वाढू शकेल. परिश्रम वाढवणे हिताचे ठरू शकेल.
मकर राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश शुभ फलदायी ठरू शकेल. करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळू शकतात. जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. पदोन्नतीची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहू शकेल. बॉस कामाने प्रभावित होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळण्याची शक्यता आहे. दुसर्या इन्स्टिट्यूटमध्ये चांगली पोझिशन, चांगला पगार मिळू शकतो.
कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. सहकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित तेवढे सहकार्य मिळेलच असे नाही. कामावर लक्ष केंद्रित करा. येणारी वेळ तुमचीच असेल, असा आत्मविश्वास बाळगल्यास गोष्टी अनुकूल ठरू शकतील. नोकरी सोडण्याचा विचार करत असलात तरी संयम आणि धैर्य ठेवावे लागेल. कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा. कौटुंबिक जीवनातही तणावाचा सामना करावा लागू शकतो.
मीन राशीच्या व्यक्तींना गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी त्रास, समस्यांचा सामना करावा लागू शकेल. अशा ठिकाणी बदली होऊ शकते जिथे तुम्हाला जायचे नाही. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता थांबणे हिताचे ठरू शकेल. आर्थिक बाबींमध्येही थोडे सावध राहावे लागेल. पैसा हुशारीने खर्च करावा लागेल. अनावश्यक खर्च न करणे चांगले ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.