Jupiter in Pisces 2022: गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:15 PM2022-04-13T15:15:33+5:302022-04-13T15:22:18+5:30

Jupiter in Pisces 2022: गुरु मीन राशीत सुमारे १३ महिन्यांपर्यंत विराजमान असणार असून, याचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल? ते जाणून घ्या...

ज्योतिषीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना अतिशय अद्भूत आणि शुभ मानला जात आहे. सर्व नवग्रह या महिन्यात स्थान बदल करणार आहेत. यापैकी एक महत्त्वाचा राशीबदल म्हणजे नवग्रहांचा गुरु बृहस्पतीचा. शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करत आहे. (jupiter transit in pisces 2022)

गुरु शुभकार्य, उत्साह, सकारात्मकता, नोकरी, करिअर, शिक्षण, भाग्य, संतान, अध्यात्म, भक्ती, धनाचा कारक मानला जातो. गुरुचा जीवनावरील प्रभाव दीर्घकाळ असल्याचे सांगितले जाते. १३ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश केल्यानंतर सुमारे १३ महिने याच राशीत असेल. (guru gochar in meen rashi 2022)

गुरु कर्क राशीत उच्चीचा असतो, तर मकर रास हे गुरुचे नीच स्थान मानले गेले आहे. गुरुचा प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक पडू शकतो, तर काही राशींना काही गोष्टीत सावधगिरी बाळगावी लागू शकेल. कोणत्या राशीच्या नशिबात काय असू शकेल, ते जाणून घेऊया...

गुरुचा मीन प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. वडिलोपार्जित संपत्तीतून काही लाभ मिळू शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकेल. सुख, समृद्धी वृद्धिंगत होऊ शकेल. विवाहेच्छुकांना नवीन स्थळे येऊ शकतील. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकेल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकेल.

गुरुचा मीन प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना संमिश्र स्वरुपाचा ठरू शकेल. कार्यक्षेत्रात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करिअर बदल आणि व्यापारात विस्तारासाठी अनुकूल कालावधी आहे. गुप्त स्रोतातून धनप्राप्तीचे योग जुळून येऊ शकतात.

गुरुचा मीन प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. कुटुंब आणि जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभू शकेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन किंवा तीर्थाटनाचे बेत आखू शकाल. बड्या, प्रभावशाली व्यक्तींशी संपर्कात येऊ शकाल. याचा भविष्याच चांगला लाभ मिळू शकेल. कार्यक्षेत्रात चांगला प्रभाव पाडू शकाल. वरिष्ठांची चांगले संबंध राहतील.

गुरुचा मीन प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. मालमत्ता, जमिनीचे व्यवहार पूर्ण होऊ शकतील. व्यापारी वर्ग आणि नोकरदार वर्गाला चांगले लाभ मिळू शकतील. विनाकारण प्रवास करणे टाळावे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी सकारात्मक कालावधी. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

गुरुचा मीन प्रवेश सिंह राशीच्या काहीसा संमिश्र ठरू शकेल. कर्जफेडीत काही अडचणी येऊ शकतील. मात्र, मालमत्ता-जमीन व्यवहारातून फायदा मिळवू शकाल. घराची डागडुजी करू शकाल. भाडेतत्त्वातून लाभ होतील. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण आणि बोलण्यावर संयम ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

गुरुचा मीन प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. भागीदारीतील व्यवसाय, व्यापार लाभ मिळू शकेल. आर्थिक आघाडी चांगली राहू शकेल. मात्र, अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागले. अध्यात्माकडील कल वाढू शकेल. काही समस्या भेडसावू शकतात.

गुरुचा मीन प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नये. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील. नोकरदारांनी आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. घाईने निर्णय घेणे टाळावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील.

गुरुचा मीन प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहू शकेल. नोकरदार वर्गाला यश, प्रगतीचे मार्ग साध्य करता येऊ शकतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभू शकेल. कौटुंबिक बिझनेस करणाऱ्यांसाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. मान, सन्मान, लोकप्रियता, प्रसिद्धी प्राप्त होऊन ती वृद्धिंगत होऊ शकेल.

गुरुचा मीन प्रवेश धनु राशीच्या व्यक्तींना चांगला ठरू शकेल. कार्यक्षेत्रात यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. अधिकारी वर्ग आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहू शकतील. मिळकतीत वाढ होऊ शकेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. गुरुचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील.

गुरुचा मीन प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकतो. मिळकतीचे स्रोत वाढू शकतील. व्यापार विस्ताराच्या योजना यशस्वी ठरू शकतील. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकेल. अनावश्यक खर्च टाळावा. भावंडांशी वाद होऊ शकतात. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभू शकेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.

गुरुचा मीन प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रगतीकारक ठरू शकतो. व्यापार-व्यवसायात लाभासह वृद्धि दिसून येऊ शकते. नोकरीत पगार वाढू शकेल. प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांकडून शुभवार्ता मिळू शकतील. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकेल. काही आव्हानांचा सामना करावा लागू शकेल.

गुरु आपलेच स्वामित्व असलेल्या राशीत प्रवेश करत असल्याने त्याचा शुभ प्रभाव मीन राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रीत करू शकाल. गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी ठरू शकेल. व्यापारी वर्गाला अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त होऊ शकेल. समाजात मान, सन्मान वृद्धिंगत होऊ शकेल. नोकरीत अडचणीच्या काळात सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. धनसंचयाच्या योजना पूर्ण होऊ शकतील.