शुक्र-केतु युती: ७ राशींना विशेष लाभ, सरकारी कामात यश; उत्पन्न वाढ, गुंतवणुकीतून नफा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:07 AM2024-08-12T07:07:07+5:302024-08-12T07:07:07+5:30

शुक्र आणि राहु-केतु यांच्या योगाने कोणत्या राशींना आर्थिक लाभ, नशिबाची साथ मिळू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात अनेक शुभ योग जुळून येत आहेत. आताच्या घडीला सिंह राशीत शुक्र आणि बुध विराजमान असून, लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. तर काही दिवसांनी सूर्याचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर शुक्र, बुध आणि सूर्य यांचा त्रिग्रही, बुधादित्य, शुक्रादित्य योग जुळून येईल.

शुक्र सिंह राशीत असल्याने शनी आणि राहु ग्रहासोबत समसप्तक आणि षडाष्टक योग जुळून आला आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे अनेक महिन्यांनी अद्भूत योग जुळून येत आहे. आताच्या घडीला कन्या राशीत केतु विराजमान आहे.

शुक्राने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर केतुशी युती योग जुळून येईल. तर मीन राशीत असलेल्या राहुशी समसप्तक योग जुळून येईल. शुक्र हा सौभाग्य, भौतिक सुख, प्रेम यांचा कारक आहे. तर केतु हा अध्यात्म, त्याग, मोक्ष यांचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे शुक्र आणि केतु यांचा युती योग काही राशींना सकारात्मक, अनुकूल, शुभ प्रभाव देणारा ठरू शकेल. जाणून घेऊया...

मेष: संपत्तीत चांगली वाढ होऊ शकेल. एखादे काम दीर्घकाळ प्रलंबित असेल तर ते या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. इच्छा पूर्ण होऊ शकतात. धनलाभ होऊ शकतो. चांगली बातमी मिळू शकते.

सिंह: केतू शुक्र युती फायदेशीर ठरू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकेल. अनेक प्रभावशाली व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. बोलण्याचा प्रभाव वाढू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. या काळात गुंतवलेले पैसे भविष्यात मोठे आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात. भावंडांशी संबंध सुधारू शकतील. जुने मित्र भेटू शकतात.

कन्या: व्यक्तिमत्व सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सकारात्मक असू शकेल. जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात अडथळे येत होते ते या काळात दूर होऊ शकतील. नोकरदारांचा प्रभाव वाढेल. नोकरदारांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे लाभ मिळतील. भागीदारीच्या कामात चांगले लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. मन प्रसन्न होणाऱ्या घटना घडू शकतील.

तूळ: विशेष लाभ होऊ शकतो. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबाकडून साथ मिळेल.

वृश्चिक: शुक्र आणि केतुचा योग शुभ ठरू शकतो. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातही तुमच्यासाठी नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढलेला दिसेल.

धनु: शुक्र आणि केतु योग शुभ ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. वैवाहिक जीवनात दीर्घकाळ चाललेला तणाव आता कमी होईल. बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळू शकते, तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते.

मकर: शुक्र आणि केतु युती लाभदायक ठरू शकते. या काळात नशिबाची साथ मिळू शकेल. पैसा, करिअर आणि बँक बॅलन्सच्या दृष्टीने हा काळ चांगला, सकारात्मक अनुकूलता देणारा ठरू शकेल. बँक बॅलन्सही चांगली राहू शकेल. देश-विदेशातही प्रवास करू शकता. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जोडीदाराशी ताळमेळ चांगला राहू शकेल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.