२०२४ केतु गोचर: ५ राशींना अनुकूल काळ, नवा बिझनेस शक्य; अडकलेला पैसा मिळेल, करिअर बहरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:07 AM2023-12-06T07:07:07+5:302023-12-06T07:07:07+5:30

सन २०२४ मध्ये केतु ग्रह कोणत्या राशीत गोचर करेल? केतुचा प्रभाव मेष ते मीन राशींवर कसा असेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह हे नियमित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतात. ग्रहांच्या गोचराचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. सर्व नवग्रहांचा देश-दुनियेसह मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो, असे सांगितले जाते. नवग्रहांपैकी छाया आणि क्रूर ग्रह मानले जाणारे राहु आणि केतु विशेष महत्त्वाचे मानले जातात.

राहु आणि केतु कायम वक्री चलनाने गोचर करतात. १८ महिन्यांनी राशीपरिवर्तन करतात. एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. असे असले तरी दोघांच्या फलांमध्ये स्थानपरत्वे फरक पडतो. शत्रू ग्रह, मित्र ग्रह, शुभ स्थाने, प्रतिकूल स्थिती यांमुळे दोन्ही ग्रहांची फलित वेगवेगळी मिळतात, असे सांगितले जाते.

नवे सन २०२४ वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. अलीकडेच राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांनी गोचर करत अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश केला आहे. केतुची दृष्टी मीन राशीवर असणार आहे. शनीशी षडाष्टक योग असणार आहे. तर गुरु ग्रहाशी वर्षाच्या मध्यात नवमपंचम योग जुळून येणार आहे. आगामी सुमारे १८ महिने केतु ग्रह कन्या राशीत असणार आहे. सन २०२४ चा विचार केल्यास केतु ग्रहाचा सर्व मेष ते मीन राशींवर प्रभाव कसा असेल? ते जाणून घेऊया...

मेष: आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवन सामान्य असले तरी, करिअर आणि आर्थिक बाबतीत संमिश्र प्रभाव असल्याचे मानले जाते. कोणत्याही बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

वृषभ: काही नवीन काम सुरू करण्याच विचार करू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना किंवा संकल्पनेवर काम करू शकता. नवीन वर्षात आर्थिक स्थिती सुधारेल. अन्य काही नवीन योजनांवरही काम करू शकता. मुलांशी प्रेमाने बोला. शक्य असल्यास नियमितपणे गणेश पूजन करावे.

मिथुन: नवीन वर्षात अस्वस्थ आणि गोंधळलेली परिस्थिती येऊ शकते. व्यवसायातील आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पैशाची कमतरता भासू शकते. गुरु सहकार्याने संकट दूर होऊ शकेल. आईची सेवा करणे लाभदायक ठरेल. आई-वडिलांचा आशीर्वाद पाठिशी राहू शकेल.

कर्क: कौटुंबिक सदस्यांशी संबंध या वर्षी सौहार्दपूर्ण असतील. काही लोक आर्थिक मदत करू शकतात. या वर्षात अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. शक्य असेल तर नियमितपणे मंगळवारी हनुमानाची पूजा करावी.

सिंह: कुठेतरी अडकलेले पैसे मिळण्यासोबतच करिअरमध्ये यशाची चव चाखायला मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. यावर्षी स्वखर्चाने मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. जे लेखक आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चांगले राहील. शक्य असल्यास गणपतीची छोटी मूर्ती घरी आणा आणि तिची रोज पूजा करा.

कन्या: पुढील वर्षभर केतु कन्या राशीत असेल. केतुच्या शुभ प्रभावामुळे व्यवसायात नवीन यश प्राप्त होईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. या वर्षी धार्मिक कार्यात रस राहील. मान-सन्मान मिळेल.

तूळ: समाजात सन्मान वाढेल. करिअरशी संबंधित कामात यश मिळेल. सुख-सुविधा वाढतील. त्यासाठी पैसेही खर्च कराल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. ज्येष्ठांचा आदर करा आणि गरजू लोकांना आवश्यक वस्तूंचे दान करा.

वृश्चिक: आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला या वर्षी कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात काही नुकसान होऊ शकते. सल्ला आहे की या वर्षी मोठे पैसे गुंतवू नका. फक्त नियमित काम करा.

धनु: पैसे आजार आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतात. अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये अनेक लोकांशी वाद होऊ शकतात. वैयक्तिक संबंधांमध्ये कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते.

मकर: चुकीच्या प्रकरणांमध्ये अडकू शकता. कोणीतरी खोटे आरोप करू शकते. आदर कमी होऊ शकतो. काही कारणास्तव पालक आणि मुलांशी तुमचे नाते प्रभावित होऊ शकते.

कुंभ: एखादी व्यक्ती भरपूर पैसे कमावते, पण त्याचा खर्चही जास्त असतो. पैसा वाचवू शकत नाही. घरातील सदस्यांसोबत भांडण आणि वाद होऊ शकतात. रागामुळे नुकसान होऊ शकते. पैशाच्या बाबतीत, इतर लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्याचे टाळले पाहिजे. शक्य असल्यास शनिवारी पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावावा.

मीन: केतू सातव्या भावात प्रवेश करतो, ते फक्त स्वतःबद्दल विचार करतात. संधीसाधू मानले जातात. काही आजार त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास दुपटीने वाढू शकतो. स्वभाव खंबीर बनू शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.