केतुचे चंद्र नक्षत्रात गोचर: ५ राशींना ६० दिवस अपार लाभ, सुख-समृद्धी वृद्धी; कल्याणच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 02:13 PM2024-07-26T14:13:09+5:302024-07-26T14:18:26+5:30

केतु चंद्राच्या नक्षत्रात असून, काही राशींना याचा लाभ सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग जुळून येत असतात. नवग्रहांना राशींप्रमाणे नक्षत्र, मूलांक यांचेही स्वामित्व बहाल केलेले आहे. नवग्रह जसे राशीपरिवर्तन करतात, तसे ते नक्षत्र गोचरही करत असतात. नवग्रहातील क्रूर आणि मायावी मानले गेलेले राहु-केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असून, पैकी केतु ग्रह चंद्राचे स्वामीत्व असलेल्या नक्षत्रात आहे.

प्रत्येक नक्षत्र चार चरणात विभागलेले असतात. केतु हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात असल्याचे सांगितले जात आहे. केतु हस्त नक्षत्रात असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक राशींना उत्तम लाभ मिळू शकतो. आनंददायी घटना घडू शकतात, असे सांगितले जाते.

राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने गोचर करतात. तसेच हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. केतुचे हस्त नक्षत्रातील गोचर कोणत्या राशींना सुवर्ण संधींचे, सुख-समृद्धीचे, अपार लाभाचे ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: केतु नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकते. धैर्य आणि शौर्य वाढू शकते. नोकरदारांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले जाऊ शकेल. मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. पैसे कुठेतरी अडकले असतील तर या काळात ते परत मिळण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.

वृषभ: केतु नक्षत्र गोचर अनुकूल ठरू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरदार कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती करू शकतात. करिअरमध्ये समाधानाची भावना असेल. पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. लोकप्रियता वाढेल. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.

सिंह: केतुचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकते. आर्थिक लाभ मिळू शकेल. या काळात तुम्हाला मेहनतीचे यथायोग्य फळ मिळू शकेल. दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येऊ शकतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.

धनु: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. करिअरमध्ये अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी यशासह पदोन्नती मिळू शकते. मन कामात व्यस्त राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. व्यवसायात दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे.

मकर: केतु नक्षत्र गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांशी चांगले संबंध असतील. आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.