गुरु-शुक्र-केतु योग: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; पैशांची बचत शक्य, सरकारकडून लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:15 AM2024-11-04T10:15:50+5:302024-11-04T10:25:52+5:30

केतुचे नक्षत्र गोचर आणि गुरु-शुक्राचा योग काही राशींना अनुकूल सकारात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

काही दिवसांत चातुर्मासाची सांगत होत आहे. यंदाचा चातुर्मासाचा काळ अनेकविध अद्भूत, दुर्लभ आणि दुर्मिळ योगांनी परिपूर्ण असल्याचे पाहायला मिळाले. नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. ०६ नोव्हेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर १० नोव्हेंबर रोजी नक्षत्र गोचर करणार आहे.

गुरु विद्यमान घडीला वृषभ राशीत आहे आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. तर शुक्र धनु राशीत प्रवेश करत आहे आणि धनु राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्राचा परिवर्तन योग जुळून येत आहे.

केतु ग्रह उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या चरणात गोचर करत आहे. गुरु आणि शुक्राचा जुळून येत असलेला परिवर्तन योग आणि केतु ग्रहाचे नक्षत्र गोचर काही राशींना अतिशय उत्तम लाभदायक, फायदेशीर, सकारात्मक अनुकूल ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

मेष: आगामी काळ फायदेशीर सिद्ध होऊ शकते. सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीत वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मुलांबद्दल थोडे चिंतेत असाल. पण हा ताण कालांतराने कमी होऊ शकतो. केतुचे नक्षत्र गोचर चांगले लाभदायक ठरू शकते.

वृषभ: हा काळ चांगला असणार आहे. अनेक नवीन संधी मिळू शकतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे आणि कामाचे कौतुक होईल. उत्साही वाटेल. व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ आहे. नवीन काम सुरू करू शकता. उत्पन्न वाढेल.

मिथुन: शुभ आणि सौभाग्यकारक काळ ठरू शकेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. समाजात सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकार्य करू शकतील. बहुप्रतिक्षित बदली किंवा बढतीची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आवडीची नोकरी मिळू शकते. दीर्घ काळापासून मालमत्ता खरेदी-विक्रीची योजना आखत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क: अनेकविध लाभ मिळू शकतात. भावंडांशी संबंध चांगले राहू शकतील. सोशल मीडिया, अध्यात्म, सोशल मीडिया, फायनान्स या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. मान-सन्मान वाढू शकतो. आर्थिक स्थितीसोबत आरोग्यासाठी काहीसा संमिश्र काळ ठरू शकतो.

सिंह: बंपर लाभ मिळू शकतो. भरपूर लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी परिवर्तन योग फायदेशीर ठरू शकतो. यश मिळू शकेल. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकारी कामात यश मिळू शकते. भरपूर पैसा मिळू शकतो. एकाग्रता वाढेल. व्यवसाय आणि करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे होऊ शकतील.

कन्या: परिवर्तन योग लाभदायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनातच आनंद येऊ शकतो. घर, वाहन, मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अचानक भाग्योदय होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

तूळ: आगामी काळ लाभदायक ठरू शकते. व्यवसायात नफा मिळण्याची आशा आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. नवीन काम करण्याची संधी मिळेल. एखादी मोठी डील मिळू शकते, प्रसिद्धी मिळू शकेल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

वृश्चिक: परिवर्तन योग खूप फायदेशीर ठरू शकतो. अशा परिस्थितीत पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी आता संपू शकतात. व्यवसाय चांगला होऊ शकतो.

धनु: शुक्राचे गोचर अतिशय शुभ ठरू शकेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. उत्पन्न वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडूनही सहकार्य मिळेल. आनंदी राहाल. भागीदारीत काम करत असाल तर हा काळ खूप चांगला आहे. नवीन करार किंवा गुंतवणूक मिळू शकते. व्यवसाय वाढेल. नोकरी करणाऱ्यांना फायदा होईल. पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकाल. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.