Kharmas 2024: खरमासाचा अशुभ काळ 'या' पाच राशींसाठी मात्र ठरणार शुभ; कोणते लाभ होणार ते पहा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 01:37 PM 2024-03-15T13:37:38+5:30 2024-03-15T13:40:33+5:30
Kharmas 2024: हिंदू धर्मात खरमासाला फार महत्त्व आहे. यावर्षी खरमास १५ मार्च, शुक्रवारपासून सुरू होत आहे आणि १३ एप्रिल, शनिवारी संपेल. खरमास अशुभ मानला जातो कारण सूर्य मीन राशीत प्रवेश करतो ज्यामुळे सूर्याची गती मंद होते. पण तरीही काही राशींसाठी खरमास लाभाची परिस्थिती निर्माण करत आहे. ज्योतिषशास्त्रीय अभ्यासानुसार असे म्हटले जात आहे की या वर्षी काही राशींना खरमासामुळे विशेष लाभ होणार आहे. त्या राशी कोणत्या ते जाणून घेऊ. तत्पूर्वी खरमासाची तोंड ओळख करून घेऊ. सूर्य १२ महिन्यात १२ राशीतून फिरत असतो. मात्र धनु आणि मीन राशीत आल्यावर सूर्याची गती मंदावते. सूर्यावर संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून असते. त्यामुळे जीवसृष्टीचा विकास कमी होतो. परिणामी वातावरणात एक प्रकारचे औदासिन्य निर्माण होते. त्यामुळे या कालावधीत शुभ कार्ये केली जात नाहीत. याउलट शक्य तेवढी धार्मिक कार्य केली जातात. अशा महिन्याला खरमास म्हणतात. तो इतरांसाठी वाईट असला तरी पाच राशींसाठी भाग्यकारक ठरणार असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ म्हणत आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
वृषभ खरमासाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अनुकूल वातावरण मिळेल. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि त्यांना प्रलंबित कामात यश मिळेल.
मिथुन खरमाच्या शुभ प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तसेच परदेश प्रवास देखील फायदेशीर ठरू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती लवकरच प्राप्त होऊ शकते.
कन्या कन्या राशीच्या लोकांना खरमासांच्या प्रभावामुळे आर्थिक फायदा होईल आणि त्याच बरोबर समाजात त्यांचा मानसन्मानही वाढेल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात तुम्हाला विजय मिळेल.
धनु धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासोबतच खरमासाच्या प्रभावामुळे कौटुंबिक जीवनात शांती आणि मधुरता येईल. नात्यात प्रेमाचा गोडवा वाढेल आणि नाती अधिक घट्ट होतील.
मकर खरमासाच्या प्रभावाने मकर राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल. तुमच्या आयुष्यात काही आव्हाने येत आहेत ज्यावर तुम्ही धैर्याने मात कराल. नोकरीत चांगले यश आणि आर्थिक लाभ होईल.