पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल! ‘या’ ६ राशींना २०२३ वर्ष लकी; बिझनेसमध्ये फायदा अन् कमाई अमाप!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:21 PM2022-12-26T12:21:48+5:302022-12-26T12:28:53+5:30

सन २०२३ हे वर्ष काही राशीच्या व्यक्तींना व्यापार, व्यवसायाच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आणि लकी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

सन २०२३ वर्ष सुरू होत आहे. नव्या वर्षाबाबत अनेकांच्या अनेविध प्रकारच्या अपेक्षा आहेत. ठरवलेल्या योजना, कामे पूर्ण होतात का, यावरही अनेकांचा भर असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नोकरी, व्यापार, करिअर, उद्योग या दृष्टिने हे २०२३ महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

सन २०२३ मध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि बडे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. शुक्र, बुध आणि शनिसह अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. शनी मकर राशीतून जानेवारीतच कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. यासह छाया ग्रह मानले गेलेले राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील.

एकूण या ग्रहांच्या चलनाचा आणि राशीपरिवर्तनाचा प्रभाव तुमच्या नोकरी, व्यापार आणि व्यवसायावर दिसून येईल. त्यामुळे सन २०२३ हे वर्ष कोणत्या राशींसाठी बिझनेस आणि कमाईच्या दृष्टीने जबरदस्त असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतील, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी २०२३ हे वर्ष व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगले असणार आहे. शनीच्या राशीबदलामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होईल. परदेशी कंपन्यांशी असलेले तुमचे संपर्क तुम्हाला यावर्षी खूप फायदे देतील. कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. वर्ष जसजसे पुढे जाईल तसतसे व्यवसायात भरभराट होईल. मात्र, वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामात अधिक सावध राहावे लागेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना २०२३ या वर्षाच्या सुरुवातीला शनीचे राशीबदलामुळे व्यवसायात चढ-उतार होऊ शकेल. या काळात तुम्हाला परदेशी करारांचा फायदा होईल. जेव्हा शनी पुन्हा रास बदलेल तेव्हा तुमचा व्यवसाय खूप वाढेल. जानेवारी ते एप्रिल दरम्यान तुम्ही व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेणे टाळले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एप्रिलनंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली वाढ दिसून येऊ शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२३ ची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टीने फलदायी ठरू शकेल. वर्षाच्या मध्यात व्यवसायात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. मे ते ऑगस्ट दरम्यान सावध राहून कामे करणे गरजेचे आहे. ऑक्टोबरनंतर परदेशी व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ होईल. कामात समृद्धी दिसून येईल.

धनु राशीच्या व्यक्तींसाठी २०२३ हे वर्ष व्यवसायाच्या दृष्टीने यशस्वी ठरेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पुढील वर्षात व्यवसाय खूप चांगला होईल. सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल. हे वर्ष व्यवसायात यश आणि समृद्धी देईल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला व्यवसायावर थोडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. डिसेंबर महिन्यात परदेशाशी निगडीत व्यवसाय चांगला होऊ शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना २०२३ हे वर्ष व्यवसायाच्या दृष्टीने यशस्वी ठरेल. वर्षाच्या मध्यात थोडे सावध असणे आवश्यक आहे. हे वर्ष तुम्हाला समृद्धी आणि व्यवसायात यश देईल. कालांतराने व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. या संधींचा चांगला फायदा घ्यावा लागेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना २०२३ हे वर्ष व्यवसायाच्या बाबतीत तुमच्या मेहनतीचे फळ देईल. व्यवसाय चांगला होईल. भरभराट होईल. व्यवसायातील काही नवीन डील फायनल करू शकता. त्या डील फायदेशीर ठरू शकतील. वर्षाच्या मध्यात काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकेल. परंतु एखाद्याच्या मदतीने समस्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.