Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना पुढील काळ शुभ; धनलाभ, भाग्योदयाचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:47 AM2022-07-19T10:47:56+5:302022-07-19T10:53:24+5:30

Numerology: जुलै महिन्याच्या उत्तरार्धातील ग्रहस्थिती काही मूलांकांच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येऊ शकते. (Numerology)

अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो.

तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. याला भाग्यांक असेही म्हटले जाते. काही मूलांकाच्या व्यक्तींना आगामी काही दिवस काही योगांमुळे शुभ जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या कालावधीत हाती घेतलेले कामात यश प्राप्त होऊ शकेल. व्यवसाय, उद्योजकांना फायदा होऊ शकेल, जाणून घेऊया...

मूलांक १ असलेल्यांना आगामी काळ धकाधकीचा जाऊ शकेल. कामाचा ताण जास्त राहील. तसेच काही महत्त्वाचे काम थांबू शकते. कार्यालयात अधिका-यांशी मतभेद होऊ शकतात, एकूणच काळजीपूर्वक काम करावे लागेल. निर्णय घेण्याची घाई करू नका, वरिष्ठांचा सल्ला घेऊनच काम करा.

मूलांक २ असलेल्या व्यक्तींना आगामी काळ शुभ ठरू शकेल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही प्रतिष्ठित लोकांना भेटू शकता, तसेच काही चांगली बातमी मिळेल. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

मूलांक ३ असलेल्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. कुटुंबासह बाहेर फिरायला जाऊ शकता. कार्यालयात मान-सन्मान वाढेल, अधिकारी आनंदी राहतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

मूलांक ४ असलेल्यांना पुढील काळ सकारात्मक ठरू शकेल. तुम्हाला कौटुंबिक आनंद मिळू शकेल, तुम्ही विद्यार्थी असाल तर कोणाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. खरेदी-विक्रीत नफा मिळू शकेल.

मूलांक ५ असलेल्यांना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. मात्र, कार्यालयात वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्याने कामात अडथळे येऊ शकणार नाही. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. कलेची आवड वाढेल.

मूलांक ६ असलेल्यांना येत्या काळात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठित लोकांना भेटू शकाल, काही चांगली बातमी मिळू शकते. कार्यालयात मान-सन्मान वाढेल. जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतील.

मूलांक ७ असलेल्यांना आगामी काळ समस्याकारक ठरू शकतो. काही अडचणींचा सामना करावा लागू शकेल. कोणत्याही कामाच्या चांगल्या-वाईट बाजू न तपासता घाईघाईने कोणतेही काम करू नका. व्यवसायासाठी हा आठवडा चांगला आहे पण व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे.

मूलांक ८ असलेल्या व्यक्तींना पुढील काळ संमिश्र ठरू शकेल. रंतु हळूहळू तुम्ही त्यावर मात करू शकाल. तुमचे स्वतःचे वाहन असले तरी तुम्हाला दुसऱ्याचे वाहन वापरावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. जुन्या मित्रांना भेटू शकाल. नोकरदारांना पदोन्नतीच्या संधी निर्माण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मूलांक ९ असलेल्यांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात पैसे खर्च करू शकता. कौटुंबिक आनंद मिळू शकतो. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला खेळात चांगले यश मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. व्यापारात जोखीम घेणे टाळा.