मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 12:27 PM2022-05-02T12:27:04+5:302022-05-02T12:32:03+5:30

मे महिन्यात तीन मोठे ग्रह मार्गी तर एक ग्रह वक्री मार्गाने राशी परिवर्तन करेल. जाणून घ्या...

एप्रिल महिन्याप्रमाणे मे महिना ज्योतिषीय महत्त्वाचा मानला जात आहे. मे महिन्याची सुरुवात ग्रहणाने झाली आहे. या मे महिन्यात तीन मोठे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत, तर एक ग्रह वक्री मार्गाने राशीबदल करेल. (May 2022 Astrology)

१४ मे रोजी नवग्रहांचा राजा सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. तर १७ मे रोजी नवग्रहांचा सेनापती मंगळ मीन राशीत विराजमान होईल. २३ मे रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. तर १० मे रोजी बुध वक्री होईल.

या ग्रहस्थितीचा ८ राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल. शुभलाभ तसेच यश-प्रगतीचे मार्ग साध्य करू शकतील. नेमक्या कोणत्या राशींना मे महिना धनदेवता कुबेराची कृपा होऊन, धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील, ते जाणून घेऊया...

मे महिना मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. मिळकतीचे नवे स्रोत सापडू शकतील. सरकारी क्षेत्रातील लोकांना पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतील. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकतील. व्यापाऱ्यांना नव्या डीलमधून फायदा मिळू शकतो.

मे महिना वृषभ राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत हा महिना खास राहील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. गरजूंना मदत कराल. कुठूनतरी अचानक धनप्राप्ती होऊ शकते. हा महिना तुमच्यासाठी आनंदाची भेट घेऊन येईल.

मे महिना मिथुन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. या महिन्यात चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. नोकरीत लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. प्रेमप्रकरणाच्या दृष्टीनेही हा महिना शुभ आहे.

मे महिना कर्क राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. या राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप शुभ राहील. चांगले पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल. करिअरमध्ये विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. या काळात अनेक नवीन मित्र बनू शकतील.

मे महिना सिंह राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. मे महिना तुमच्यासाठी पैशाचा मार्ग खुला करणारा सिद्ध होईल. आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सुख-सुविधा वाढतील. समाजात स्वत:ची ओळख निर्माण करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नोकरीत उच्च पद मिळू शकेल.

मे महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना मे महिना उत्तम ठरू शकेल. विद्यार्थ्यांना भावंडांचे सहकार्य लाभू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला महिना. दाम्पत्य जीवनात सकारात्मकता येईल. कार्यक्षेत्रात हितशत्रूंपासून सावध राहा.

मे महिना धनु राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. या राशीच्या लोकांसाठी मे महिना स्थावर संपत्तीच्या दृष्टीने फायदेशीर राहील. घर आणि जमीन खरेदीचीही दाट शक्यता आहे. नोकरीशी संबंधित लोकांना चांगली कमाई करता येईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. काही चांगली बातमी मिळू शकते.

मे महिना मकर राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल. आगामी कालावधीत शुभ वार्ता मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पराक्रम, आत्मविश्वास वाढू शकेल. यश, प्रगतीचे मार्ग साध्य करू शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात वडिलांचे सहकार्य लाभू शकेल. पोलीस, सैन्य दल यांसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मे महिना उत्तम ठरू शकेल.

मे महिन्यात यंदाच्या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण होणार असून, ते बुद्धपौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमेला होणार आहे. सूर्यग्रहणाच्या अगदी केवळ १५ दिवसांच्या अंतराने लगेचच चंद्रग्रहण होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.