कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 01:11 PM2024-10-12T13:11:42+5:302024-10-12T13:23:32+5:30

कोजागरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विशेष पूजा केला जाते. कोणत्या राशींना शुभ फल लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

नवरात्रोत्सवाची सांगता झाली आहे. आता दिवाळीचे सर्वांना वेध लागले आहेत. दिवाळीच्या तयारीची लगबग सुरू होत आहे. तत्पूर्वी अश्विन महिन्याची पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांमध्ये कोजागरी पौर्णिमेचे महात्म्य अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते.

कोजागरी पौर्णिमा, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे. या निमित्त बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध यांचा हा योग अतिशय शुभ आणि लाभदायक मानला जातो. या योगाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.

कृषी संस्कृतीत कोजागरी पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. या कालावधीत अशा प्रकारचा राजयोग जुळून येणे शुभ फलदायी मानले जाते. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? ते जाणून घेऊया...

मेष: उत्साही वाटेल. सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. संयम आणि शहाणपणाने समस्यांवर उपाय शोधू शकाल. मित्राच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात पैशाशी संबंधित चिंता दूर होतील. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी पैशाची व्यवस्था करण्यात व्यस्त असाल. चिंता दूर होऊ शकते. वैवाहिक जीवन मधुर असेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन: प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. वरिष्ठांच्या मदतीने कार्यक्षेत्राशी संबंधित मोठी समस्या दूर होऊ शकेल. प्रवास आनंददायी आणि लाभदायक असतील. हितचिंतक आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. संकटसमयी ते पाठीशी उभे राहतील. जे परीक्षा स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत, त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

कर्क: बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकतो. भौतिक सुख मिळू शकते. पैसे वाचवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी प्रयत्नांवर समाधानी राहतील. नवीन प्रकल्प किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना विविध सौद्यांमधून प्रचंड नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

तूळ: बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. व्यक्तिमत्त्व सुधारेल. कार्यशैली सुधारेल. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची योजना आखत असाल तर आवडीची नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील.

वृश्चिक: मित्र आणि हितचिंतकांच्या सहकार्याने सर्व कामे सहज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधीनस्थांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ अधिकारी कामाचे पूर्ण कौतुक करतील. कुटुंबासोबत किंवा मनोरंजनासाठी कुठेतरी जाण्याची संधी मिळेल. कमी अंतराचा सुखद प्रवास संभवतो. अचानक एखादी प्रिय व्यक्ती भेटू शकते. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल.

धनु: व्यवहारात सावधगिरीची भूमिका घ्यावी. नशिबाची पूर्ण साथ लाभू शकेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळाली तर ती स्वीकारण्यास अजिबात संकोच करू नका. एखाद्याशी संबंध बिघडले असतील तर मध्यस्थांच्या मदतीने पूर्ववत करू शकाल. प्रेम जीवनातील गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायातही चांगली प्रगती होईल.

मकर: बुधादित्य राजयोग शुभ ठरू शकतो. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगती होऊ शकेल. व्यावसायिकांसाठी काळ फायदेशीर ठरू शकेल. वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.

कुंभ: संयम आणि धैर्य ठेवल्यास सर्व कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व राहू शकेल. समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण होईल. नोकरदारांना क्षमता सिद्ध करण्यासाठी नवीन प्रकल्पाचा भाग बनण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वरिष्ठांशी समन्वय ठेवा. मित्राच्या मदतीने काम पूर्ण होऊ शकेल. जोडीदारासोबत उभे राहिल्याने तुमचे मनोबल वाढेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.