नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:35 PM 2024-10-07T14:35:39+5:30 2024-10-07T14:47:07+5:30
नवरात्रात महाअष्टमी, महानवमीचे दिवस अनेक राशींना शुभ लाभदायी आणि धनलक्ष्मीची कृपा असणारे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... नवरात्राचा शुभ काळ सुरू आहे. हजारो घरांमध्ये आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यांनुसार देवीची सेवा केली जात आहे. काही दिवसांनी नवरात्राची सांगता होत आहे. तत्पूर्वी महाअष्टमी, महानवमी साजरी केली जाईल. त्यानंतर विजयादशमी, दसरा साजरा होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, १० ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशीत शुक्र ग्रह आहे. तसेच अन्य युती योग जुळून येणार आहेत. याच कालावधीत लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. हा योग राजयोगाप्रमाणे फले देणारा मानला जातो.
लक्ष्मी नारायण राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो तेव्हा त्या व्यक्तीला धन-वैभव आणि समाजात मान-सन्मान सोबतच आनंद मिळतो. लक्ष्मी नारायण राजयोगाचा फायदा कोणत्या राशींना होणार आहे, ते जाणून घेऊया...
मेष: मनात अनेक नवीन कल्पना असतील. नवीन ओळखी होतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र, हाती घेतलेली कामे पूर्ण करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. चंद्र भ्रमणाची शुभ फळे प्राप्त होऊ शकतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ राहील. थोड्या प्रयत्नात चांगला योग येईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही अडचणी असतील, मित्र-मैत्रिणींच्या संगतीत वाहवत जाऊ नका. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला ऐकण्यातच हित राहील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. हाती घेतलेले एखादे महत्त्वाचे काम बराच वेळ खाऊ शकते. मात्र, शेवटी यश मिळू शकेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
मिथुन: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. चांगल्या बातम्या मिळतील. चंद्र-शुक्र युतीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मुलांची प्रगती होईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. काही लोक विरोधात कारवाया करतील. क्रोधाला आवर घाला. बोलण्याचा उलटा परिणाम होऊ नये, याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. अचानक धनलाभ होईल.
कर्क: अनपेक्षित लाभ होऊ शकतात. इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. नोकरीत नवीन संधी मिळेल. मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. इतर अनेक लाभ होतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील.
सिंह: प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मोठ्या उत्साहाने कामे कराल. अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. हाती पैसा खेळता राहील. शुक्र-चंद्र युतीची शुभ फळे मिळतील. मात्र, गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरातील कामांसाठी वेळ मिळेल. मुलांचे यश सुखावून जाईल.
कन्या: विविध क्षेत्रांत अनुकूल फळे देणारा काळ राहू शकेल. शुक्र-चंद्र युतीमुळे धनवर्षाव होईल. हा काळ फायदेशीर राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळेल.
तूळ: ग्रहमानाची उत्तम साथ मिळेल. अनपेक्षित लाभ होऊ शकतात. थोडे सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करा. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. मात्र, निष्कारण खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. कागदोपत्री पूर्तता करताना खबरदारी घ्या. कुठेही सही करू नका. मालमत्तेच्या कामात सफलता मिळेल. आवडत्या खाद्य पदार्थाचा आस्वाद घेता येईल. गुंतवणूक जपून करा.
वृश्चिक: चंद्र-शुक्र युतीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. मौजमजा आणि प्रवास यावर खर्च करण्याकडे कल राहील. काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. मात्र, लवकरच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल. आर्थिक आवक चांगली राहील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. त्यासाठी योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळेल. अधिकारी वर्गाची चांगली साथ राहील.
धनु: शुभ ग्रहांच्या युतीचा अनुकूल परिणाम जाणवेल. कानावर चांगल्या बातम्या पडतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. महत्त्वाच्या प्रकल्पांची तयारी वेग घेईल. यश मिळाल्याने बेफाम होऊन चालणार नाही. काही लोक चुकीचा सल्ला देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. थोडे सावधपणे वागा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. कुणाचा अपमान करू नका. नोकरीत पारडे जड राहील.
मकर: शुभ ग्रहांची युती प्रगतीला पूरक राहील. नोकरीत नवीन व मोठी संधी मिळेल. अनेक दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण होईल. पगारवाढ व तत्सम फायदे होतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. खूप सढळ हाताने खर्च करू नका. घरात आनंदी वातावरण राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
कुंभ: भाग्याची साथ राहील. जे ठरवाल ते सिद्धीस जाईल. महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखीचे फायदे होतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मान-सन्मान प्राप्त होईल. नोकरीत अनुकूल बदल होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे.
मीन: थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. कामाची फार घाई करू नका. स्वतःची काळजी घ्या. कामांचे नियोजन करा. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादी जुनी गुंतवणूक लाभदायक ठरु शकते. मुलांची प्रगती होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.