एकादशीला जन्माला आलेल्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये काय असतात, ते पाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:06 PM2021-08-04T16:06:14+5:302021-08-04T16:26:58+5:30

आपला जन्मदिवस आपल्याला लक्षात असतो. परंतु आपले पूर्वज तिथीनुसार जन्मदिवस साजरा करत असत. प्रत्येक तिथीचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. आज कामिका एकादशी आहे. त्यानिमित्ताने आपण एकादशी या तिथीला जन्माला आलेल्या लोकांची स्वभाव वैशिष्टये जाणून घेऊ.

एकादशी ही तिथी भगवान विष्णूंची प्रिय तिथी असल्याने या तिथीला जन्माला आलेले लोक सात्विक वृत्तीचे असतात. त्यांचा स्वभाव शांत व मन निर्मळ असते.

त्यांचे मन निर्मळ त्यांचे विचारही शुद्ध असतात.

हे लोक विनम्र आणि ज्ञानी असतात. त्यांना संशोधनात रस असतो.

समाजात त्यांना सन्मान आणि आदर प्राप्त होतो. त्यांचा नावलौकिक होतो.

एकादशीला जन्माला आलेले लोक धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होतात. उत्सवाचे आयोजन करण्यात रस घेतात.

असे लोक आपल्या आई वडिलांना आणि गुरुंना मान देतात.

त्यांच्याप्रमाणे त्यांच्या पोटी जन्माला येणारे संतान देखील सात्विक वृत्तीचे उपजते.

हे लोक स्वतः न्यायाची वाट चालतात आणि इतरांनाही त्या मार्गावरून चालण्यास भरीस पाडतात. थोडक्यात सन्मार्गाला लावतात.

या लोकांनी कायम सन्मार्गाचीच वाट धरून ठेवली तर त्यांच्या वाट्याला अपार सुख आणि समाधान येते.