Magh Purnima 2022 : सुख, शांती आणि वैभव प्राप्तीसाठी माघ पौर्णिमेला 'हे' तीन उपाय अवश्य करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:58 AM2022-02-15T11:58:44+5:302022-02-15T12:02:57+5:30

१६ फेब्रुवारी रोजी अर्थात बुधवारी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी शक्य झाल्यास गंगेत केलेले स्नान किंवा निःस्वार्थ हेतूने केलेले दान तुम्हाला भरघोस पुण्य मिळवून देईल. या व्रतामुळे ३२ पट जास्त पुण्य लाभते म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात. या तिथीला भगवान विष्णू आणि चंद्रदेवांची पूजा करावी. सुख, शांती आणि वैभव प्राप्तीसाठी माघ पौर्णिमेला सांगितलेले हे साधे सोपे उपाय जरूर करून पहा.

माघ पौर्णिमेला एका वाटीत कच्चे दूध आणि तांदूळ घालून चंद्राला नैवेद्य दाखवावा. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.

देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी ११ कवड्यांवर हळद वाहून दिवसभर कवड्या देवापाशी ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी त्या कवड्या लाल वस्त्रात गुंडाळून तिजोरीत ठेवाव्यात. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

वैवाहिक जीवन सुखाचे जावे, म्हणून पती पत्नीने मिळून रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गायीच्या दुधाचे चंद्राला अर्घ्य द्यावे. असे करण्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जाते.