Maha Shivratri 2023: महाशिवरात्रीला उघडणार 'या' सहा राशींचे भाग्य आणि हाती लागणार मोठे घबाड! By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:27 PM 2023-01-31T13:27:11+5:30 2023-01-31T13:35:52+5:30
Maha Shivratri 2023: यंदा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे, शिवभक्तांच्या दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. कारण त्यादिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे सहा राशींचे भाग्याचे द्वार उघडणार आहे. कोणाला नोकरी, व्यवसायात यश तर कोणाच्या वाट्याला आर्थिक लाभ येणार आहे. जाणून घेऊया सविस्तर... माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र त्या सर्व शिवरात्रीच्या तुलनेत माघ मासातील शिवरात्रीला अधिक महत्त्व असते, कारण काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.
यंदाच्या वर्षी म्हणजेच सन २०२३ मध्ये महाशिवरात्री १८ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ०८ वाजून ०३ मिनिटांनी सुरु होत आहे. तर, माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ०४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. या दिवशी अनेक प्रकारचे दुर्मिळ तसेच अद्भूत शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. एक म्हणजे शनी प्रदोष आणि दुसरा म्हणजे सर्वार्थसिद्धी योग! साडेसातीच्या जातकांसाठी शनी प्रदोष आणि धनलाभ होण्याच्या दृष्टीने भाविकांसाठी सर्वार्थसिद्धी योग पुढील सहा राशींसाठी विशेष फलदायी ठरेल.
मेष ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा सण खूप खास असणार आहे. महादेवाच्या कृपेने प्रत्येक कामात यश मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. महाशिवरात्रीचा काळ उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. त्याच वेळी, करिअरमध्ये प्रगतीचा आलेख उंचावण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी नव्या संधी चालून येतील.
वृषभ ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांना महाशिवरात्री नवनवीन संधी घेऊन येणारी ठरेल. या काळात नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल ठरेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
मिथुन महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळून निघेल. महादेवाच्या कृपेने तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. त्याचबरोबर नोकरदार लोकांसाठीही हा काळ चांगला राहील. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय विस्ताराच्या नवीन संधी प्राप्त होतील. नवे मित्र जोडले जातील, ज्यांचा भविष्यात मोठा आधार मिळेल.
तूळ ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीपासून तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. तूळ राशीच्या चौथ्या घरात हा योग तयार होणार आहे. हे स्थान भौतिक सुखाचे आणि मातृसौख्याचे मानले जाते. अशा स्थितीत या काळात तुमच्या सांसारिक सुखांमध्ये वाढ होईल. बँक बॅलन्स वाढेल. भगवान शंकराच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमच्या क्षेत्रात भरघोस प्रगती कराल.
धनु नुकतीच साडे सातीतून मुक्त झालेले धनु राशीचे जातक महाशिवरात्रीच्या काळात सर्वार्थाने प्रगती करतील. या काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. या दिवशी कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. याशिवाय, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. उत्पन्न वाढीचा हा काळ आहे, संधी ओळखून संधीचे सोने करा. जोडीदाराशी मतभेद परवडणार नाहीत, नात्यात झुकते माप घ्यावे लागले तरी तसे करणेच तुम्हाला फायद्याचे ठरेल.
कुंभ महाशिवरात्रीच्या दिवशी घडणाऱ्या दुर्मिळ योगायोगामुळे कुंभ राशीच्या लोकांचे नशीबही उजळणार आहे. या काळात या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, तसेच रखडलेली कामे पूर्ण होतील. आगामी काळात अर्थाइक स्थैर्य लाभल्याने एखादी कौटुंबिक सहल आयोजित कराल. जोडीदाराच्या साथीने नोकरी, व्यवसायात प्रगती कराल. हा काळ आनंदाचा आणि समाधानाचा ठरेल.
राजयोगाचा लाभ वरील राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश नसला म्हणून नाराज होऊ नका, कारण याच काळात जुळून येत आहे आणखी एक योग. त्याचा लाभ बाराही राशींना होणार आहे. त्या दिवशी मालव्य नावाचा शुभ राजयोग जुळून येत आहे. या शुभ योगात भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कामांमध्ये अडचणी येत होत्या, ती सर्व कामे आता हळूहळू पूर्ण होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.