६९ दिवस विशेष! मंगळ गोचराने ५ राशी मालामाल, सर्वोत्तम लाभ; ५ राशींना सतर्कतेचा संमिश्र काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 12:58 PM2023-03-07T12:58:19+5:302023-03-07T13:06:01+5:30

सन २०२३ मध्ये पहिल्यांदा मंगळ राशीपरिवर्तन करत असून, तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्यात महत्त्वाच्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होत असून, याचा प्रभाव विशेष मानला जात आहे. बुध, शुक्र, सूर्यासह मंगळ ग्रह या महिन्यात गोचर करत आहे. आताच्या घडीला मंगळ शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत असून, १३ मार्च रोजी मंगळ बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करत आहे.

गेल्या ५ महिन्यांपासून मंगळ वृषभ राशीत विराजमान होता. या वर्षी मंगळ प्रथमच राशीपरिवर्तन करत आहे. मंगळाचा शनीसोबत नवम पंचम योग तयार जुळून येत आहे. पुढील काही दिवस मिथुन राशीत प्रवेश करणारा मंगळ ५ राशींसाठी सर्वोत्तम ठरू शकेल. तर ५ राशींसाठी काहीसा संमिश्र ठरू शकेल. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचा मिथुन प्रवेश अतिशय अनुकूल परिस्थिती प्रदान करणारा मानला जात आहे. सकारात्मकता मिळू शकेल. अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी काळ शुभ ठरणार आहे. वडील आणि गुरूंचे पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरसाठी काळ खूप अनुकूल ठरू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. बोलण्यात कठोरता येऊ शकते. खर्च वाढू शकतो. बोलण्यावर संयम ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रेमप्रकरणांसाठी हा काळ चांगला नाही. मुलांबद्दल आणि त्यांच्या अभ्यासाबद्दल खूप सकारात्मक व्हाल. स्वभावातील आक्रमकपणा वाढू शकतो. याचा परिणाम कार्यालयातील सहकाऱ्यांशी असलेल्या नात्यांवर होऊ शकतो. वडील आणि शिक्षकांचा आदर करावा.

मिथुन राशीत होत असलेला मंगळाचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणामकारक ठरू शकेल. आईच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मालमत्ता खरेदीत मोठा लाभ मिळू शकतो. जमीन खरेदी-विक्रीसाठी हा काळ अनुकूल आहे. भागीदारी व्यवसायात नफा अपेक्षित आहे. जीवन साथीदाराची सर्व प्रकारे साथ मिळेल. बोलण्यावर संयम ठेवा. सर्वांचा आदर करा.

कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. व्यावसायात अचानक काही बदल होऊ शकतात. नको असलेल्या ठिकाणी बदली होऊ शकते. आत्मविश्वास कमतरता दिसून येऊ शकेल. खर्चात वाढ होऊ शकेल. निर्णय क्षमतेत कमतरता दिसून येऊ शकेल. जोडीदारासोबत तणाव निर्माण होऊ शकतो.

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचा मिथुन प्रवेश विशेष फायदेशीर मानला जात आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. पैसे गुंतवणे शुभ ठरू शकेल. भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. पगारवाढ होऊ शकेल. पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षांसाठी वेळ अनुकूल असून अधिक चांगली कामगिरी करू शकाल.

कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश शुभ प्रभावाचा ठरू शकेल. व्यावसायात चांगले परिणाम मिळू शकतात. प्रमोशन मिळू शकते. बॉससोबत चांगले ट्यूनिंग असेल. ऑफिसमधील लोक कामाचे कौतुक करतील. बक्षीस मिळू शकेल. यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश फारसा शुभ मानला जात नाही. शत्रू नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. अनिश्चितता वाढू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनातही असमाधानी राहाल. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्वभावात उग्रपणा वाढल्यामुळे बोलण्याने जवळचे लोक दुखावतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

धनु राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. प्रेमसंबंधांवर आणि वैवाहिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल. जोडीदार आक्रमकपणे वागू शकतो. अस्वस्थ असाल. ऑफिसमध्ये कोणाशी वाद होऊ शकतो. कामगिरी कमी झाल्यास अधिकारी नोटीस देऊ शकतात. स्वभाव आणि आक्रमक वृत्ती या दोन्हींमुळे नुकसान होऊ शकते. पैसे वाचवण्यात अपयशी ठराल.

मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. मकर ही मंगळाची उच्च रास मानली जाते. करिअरमध्ये या वेळी इच्छित नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. खर्च प्रचंड वाढू शकतो. कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. स्वभावात काही कारणाने चिडचिडेपणा येऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.

कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश समस्याकारक ठरू शकेल. अडचणी वाढू शकतात. मुलांशी वाद वाढू शकतो. नात्यात अधिक ताबा ठेवल्याने समस्या आणखी वाढू शकतात. नात्यात थोडी स्पेस देऊन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.