मंगळ-केतु अशुभ युती सांगता: ५ राशींची दिवाळी, लक्ष्मी देवी भरेल झोळी; सुख-समृद्धीचे दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 03:03 PM2023-10-07T15:03:03+5:302023-10-07T15:03:03+5:30

यंदाची दिवाळी ५ राशींसाठी शुभलाभदायक आणि पुण्यफलदायी ठरू शकते. जाणून घ्या...

ऑक्टोबर महिन्यात नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ तूळ राशीत आहे. याच राशीत क्रूर छायाग्रह असलेला केतु विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह उग्र मानले जातात. या दोन्ही ग्रहांची युती फारशी चांगली मानली गेलेली नाही. या युतीचा प्रतिकूल प्रभाव देश-दुनियेसह सर्व राशींवर पडतो, असे म्हटले जाते.

नवरात्र संपल्यानंतर दिवाळीपूर्वी मंगळ आणि केतु यांच्या अशुभ योगाची सांगता होणार आहे. राहु आणि केतु राशीपरिवर्तन करणार आहे. राहु मेष राशीतून मीन राशीत आणि केतु तूळ राशीतून कन्या राशीत वक्री चलनाने गोचर करणार आहेत. त्यामुळे मंगळ आणि केतुचा युती योग समाप्त होणार आहे.

या प्रतिकूल योगाची सांगता झाल्याचा ५ राशींना शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. लक्ष्मी देवीची अपार कृपा लाभू शकेल. यामुळे आर्थिक आघाडी, सुख-समृद्धी, धन-धान्य, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, बिझनेस अशा आघाड्यांवर सर्वोत्तम लाभांची संधी प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युतीची सांगता विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबी सुधारतील. पैशाच्या गुंतवणुकीबाबत केलेले नियोजन यशाची नवीन उंची गाठेल. संभाषणाने लोक प्रभावित होतील. मीडिया, मार्केटिंग आणि नवीन व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. नवीन फायदे मिळतील. करिअरच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

वृषभ राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युतीची सांगता सौभाग्यकारक ठरू शकेल. जीवनात सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढताना दिसेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे यावेळी पूर्ण होणे अपेक्षित होते. खर्च झाला तरी उत्पन्नही वाढेल. परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामगिरी सुधारण्यासाठी केलेल्या योजना अपेक्षित यश मिळवून देतील. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यात पैशाची कमतरता भासू शकते.

मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युतीची सांगतेचे शुभ परिणाम मिळू शकतील. आत्तापर्यंत आर्थिक संकटात सापडलेल्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. व्यवसायात पैशांचा ओघ वाढेल. गुंतवणुकीच्या प्रमाणात नफा मिळू लागेल. पैसे कमावण्यासोबतच बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही चांगली वेळ आहे. चांगला परतावा मिळू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युतीची सांगता चांगली ठरू शकेल. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू लागतील. खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना दुसऱ्या संस्थेकडून चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसायाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. कठोर परिश्रम केल्याने लाभ आणि प्रगती होईल. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युतीची सांगता शानदार ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने उत्तम संधी मिळतील. काही कारणास्तव तुम्हाला मोठ्या खर्चाचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू परिस्थिती सुधारेल. संपत्ती वाढू शकेल. कुटुंबात शांतता राहील. सर्वांमधील संबंध पूर्वीपेक्षा चांगले असतील. कुटुंबासाठी सुख-सुविधांची व्यवस्था करण्यात यशस्वी व्हाल. भविष्यासाठी पैसेही वाचवू शकाल.

ऑक्टोबर महिन्यात तूळ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. सध्या या राशीत मंगळ आणि केतु ग्रह असून, नवरात्रानंतर सूर्य आणि बुध ग्रह प्रवेश करणार आहेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.