मंगळाचा शुक्र नक्षत्रात प्रवेश: ६ राशींना मंगलमय, भाग्योदय; पद-पैसा वाढ, सर्वाधिक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 09:08 AM2024-07-23T09:08:53+5:302024-07-23T09:17:44+5:30

शुक्राच्या राशीत असलेला मंगळ आता शुक्राच्या नक्षत्रातही प्रवेश करणार आहे. कोणत्या राशी लकी ठरू शकतील? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह जसे राशीपरिवर्तन करत असतात. तसे ते नक्षत्रातूनही गोचर करत असतात. आताच्या घडीला नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ वृषभ राशीत आहे. या राशीत विराजमान असलेल्या गुरु ग्रहाशी मंगळाचा योग जुळून आला आहे. मंगळ ग्रह कृतिका नक्षत्रात असून, २७ जुलै रोजी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

वास्तविक नक्षत्र समूह मिळून रास तयार होत असते. रोहिणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. विशेष म्हणजे वृषभ राशीचा स्वामीही शुक्र आहे. त्यामुळे शुक्राच्या वृषभ राशीत असलेला मंगळ आता शुक्राच्या नक्षत्रातही प्रवेश करत आहे. हा योग उत्तम लाभदायक मानला जात आहे.

मंगळाचा रोहिणी नक्षत्रात होत असलेला प्रवेश अनेक राशींना लाभदायी, मंगलमय, शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. नोकरी, करिअर, कुटुंब, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया...

मेष: मंगळाचे नक्षत्र गोचर लाभदायक ठरू शकते. व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येऊ शकेल. नशिबाच्या मदतीने अनेक कामे सहज पूर्ण होऊ शकतील. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना आता करिअरमध्ये प्रगती आणि पगार वाढीसाठी चांगल्या संधी मिळू शकतील. पराक्रम वाढू शकेल.

वृषभ: मंगळाचा नक्षत्र बदल शुभ ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा होऊ शकतो. ते सर्व प्रकारच्या आव्हानांना हुशारीने सामोरे जाण्यास सक्षम असतील. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरदारांना बढती मिळू शकते.

सिंह: नशिबाची साथ मिळेल. आत्मविश्वास वाढेल. दीर्घकाळापासून रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. ते योग्य प्रयत्नांनी लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार किंवा लॉटरीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. तरुणांना नवीन संधी मिळू शकतात. पैसे मिळवण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात. सरकारी नोकरी करणारे विलासी जीवनाचा आनंद घेऊ शकतात.

तूळ: व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक संपर्कांद्वारे व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते. करिअरमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील. मेहनतीमुळे नोकरीत प्रगती होईल, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यानंतर मन प्रसन्न राहील. जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक: नवग्रहांचा सेनापती मंगळाच्या नक्षत्र गोचराचा फायदा होऊ शकेल. या राशीचा स्वामी मंगळ आहे. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभही मिळू शकतो. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ ठरू शकेल. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

मकर: मंगळाचे नक्षत्र गोचर शुभ ठरू शकते. नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींना भेटू शकाल. भविष्यात फायदा होऊ शकतो. कोणतीही जमीन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच नशिबाची साथ मिळू शकेल. देश-विदेशातही प्रवास करण्याची संधी मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.