२४ मार्च : उद्याचा दिवस असेल 'या' चार राशींसाठी खास, धनलाभाची पूर्ण होईल आस! By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:00 AM 2022-03-23T11:00:42+5:30 2022-03-23T11:08:03+5:30
ज्योतिष शास्त्रात शुभ मानल्या जाणार्या ग्रहांपैकी एक बुध ग्रह उद्या म्हणजेच २४ मार्च २०२२ रोजी राशी बदलणार आहे. बुध ग्रह हा वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा दाता आहे असे म्हटले जाते. कुंडलीत बुध लाभदायक असेल तर ती व्यक्ती वक्तृत्वाने संपन्न आणि बुद्धिमान असते. जर ती व्यवसायात असेल तर तिला भरपूर पैसे मिळतात. २४ मार्च रोजी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य आधीच उपस्थित आहे. ४ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ असणार आहे. त्या चार राशी पुढीलप्रमाणे -
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह कमाईचे साधन वाढवू शकतो. धनलाभ होईल. करिअरमध्ये फायदे होतील. उत्पन्न वाढेल. अचानक मोठा लाभ आणि यश मिळू शकते. पैशांचे नियोजन करून येत्या काळात ऐच्छिक स्थळी कुठेतरी फिरायला जाऊ शकता.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा राशीबदल शुभ ठरेल. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करता येईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगला फायदा होऊ शकतो.
सिंह : बुधाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना धनलाभ आणि भरपूर आनंद देईल. कुटुंबासाठी हा काळ उत्तम राहील. जीवनात मोठा बदल घडतील. ज्यामुळे प्रतिष्ठा, पैसा आणि पदोन्नती मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. अचानक आर्थिक लाभ होतील.
कुंभ : बुधाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ देईल. रखडलेले पैसे परत मिळू शकतील. उत्पन्न वाढू शकते. विशेषत: व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. कामात यश मिळेल. सर्व कामे सहज पार पडतील.