प्रदोष परिवर्तन शुभ योग: ७ राशींवर शिव-शनि कृपा, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीचा लाभ, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:07 IST2024-12-28T07:07:07+5:302024-12-28T07:07:07+5:30

सन २०२४ रोजीचे शेवटच्या शनि प्रदोष व्रताला शुभ परिवर्तन योग जुळून येत आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

२०२४ ची सांगता होत आहे. वर्ष संपताना शनि प्रदोष व्रत आचरले जाणार आहे. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यातील शनि प्रदोष व्रत शनिवार, २८ डिसेंबर २०२४ रोजी आहे.

शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. काही मान्यतांनुसार, शनी देव महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे शनिप्रदोषच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

साडेसाती सुरू आहे, त्यांनी आवर्जून हे व्रताचरण करावे, असे सांगितले जाते. या दिवशी परिवर्तन योग जुळून येत आहे. चंद्र मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत असेल, तर मंगळ ग्रह चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी जुळून आलेल्या या योगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल? जाणून घ्या...

मेष: हा काळ शुभ ठरू शकेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असतील तर चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. शनि कृपेने सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मकता मिळू शकेल. अनेक बाबींमध्ये दिलासा मिळू शकेल.

कर्क: सन २०२४ शेवटचे प्रदोष व्रत खूप खास असेल. भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद लाभेल. नोकरदारांना उत्पन्नात वाढ करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. रखडलेली कामे लवकर पूर्ण होऊ शकतात. व्यापारात चांगला नफा कमावण्याची संधी मिळू शकेल.

सिंह: आगामी काळ मंगलमय ठरू शकेल. मनातील अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतील. सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरू शकेल. सन्मान आणि संपत्ती वाढू शकेल. शनिदेवाची कृपा लाभू शकेल. जोडीदार आणि मुलांसोबत नवीन वर्षात कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल. कुटुंबासोबत वेळ मजेत घालवाल.

कन्या: काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात मंगल कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसायात वाढ होऊ शकते. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि दुकानदार यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

तूळ: आगामी काळ लाभदायक ठरू शकेल. मुलांकडून काही शुभ बातम्या मिळतील. सन्मान आणि संपत्तीत चांगली वाढ होईल. उत्साह वाढू शकेल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळू शकेल. काही लोकांकडून महत्त्वाची माहिती मिळू शकेल.

धनु: सकारात्मक काळ असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचण येत असेल तर शिक्षकांकडे जाऊन त्यावर उपाय शोधावा. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अधिकारी वर्गाच्या पाठिंब्यामुळे हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.

कुंभ: व्यावसायिकांसाठी मालमत्ता खरेदीसाठी हिताचा काळ आहे. जोडीदारासोबत परदेशात सहलीला जाऊ शकता. नोकरदार लोकांच्या कामावर बॉस खूश असेल. पगार वाढविण्याचा विचार करू शकेल. व्यापारी आणि दुकानदारांना मोठा नफा होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.