Mangal Ketu Yuti 2021: मंगळ-केतुचा संयोग: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींनी अखंड सावधान राहावे; नेमकं काय करू नये? पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:15 PM 2021-12-15T18:15:54+5:30 2021-12-15T18:21:20+5:30
Mangal Ketu Yuti 2021: मंगळ आणि केतुची वृश्चिक राशीतील युती ४ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. तुमची रास कोणती? पाहा, डिटेल्स... ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांच्या युती किंवा संयोग हे अतिशय शुभ मानले जातात. तर, काही ग्रहांच्या युती किंवा संयोग हे मोठ्या घडामोडींचे संकेत देणारे ठरणारे असतात. आताच्या घडीला मंगळ आणि केतु या दोन ग्रहांचा वृश्चिक राशीत संयोग झाला आहे. (mangal ketu yuti)
सन २०२० च्या सप्टेंबर महिन्यात केतु वक्री चलनाने धनु राशीतून वृश्चिक राशीत विराजमान झाला होता. तर, काही दिवसांपूर्वी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला नवग्रहांचा सेनापती मानला जाणार मंगळ ग्रह आपले स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत मार्गी चलनाने विराजमान झाला आहे. (Mangal And Ketu Yuti December 2021)
मंगळ ग्रह उग्र ग्रह मानला जातो. तर, केतु ग्रह छाया ग्रह मानला जातो. आताच्या घडीला हे दोन्ही ग्रह अतिशय जवळच्या अंशांवरून संचार करत आहेत. यामुळे पुढील १० ते १५ दिवस बहुतांश राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे, असे सांगितले जात आहे. तसेच अनेक रहस्य उघड होतील, तर काही आश्चर्यचकीत करणाऱ्या घटनाही घडू शकतील, असे सांगितले जात आहे. (mars and ketu conjunction 2021)
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग मेष राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा अडचणीचा ठरू शकेल. कार्यक्षेत्रात अतिरिक्त कामाचा ताण वाढता राहील. मानसिक स्तरावरही काही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. या कालावधीत जोखीम पत्करून कामे करू नयेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे. योग आणि ध्यानधारणा उपयुक्त ठरू शकेल.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग वृषभ राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. वैवाहिक जीवनात काही मतभेद उद्भवू शकतात. क्रियेवर प्रतिक्रिया देणे टाळावे. या कालावधीत शब्दांचा वापर जपून आणि विचारपूर्वक करावा. वादविवाद टाळावेत, असे सांगितले जात आहे.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. कार्यक्षेत्रात आपण घेत असलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल. हितशत्रू आणि विरोधकांवर आपण वरचढ राहाल. आर्थिक आघाडीसाठी हा संयोग शुभ ठरू शकेल. मात्र, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग कर्क राशीच्या व्यक्तींना संमिश्र स्वरुपाचा ठरू शकेल. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळू शकते. मात्र, मुलांच्या चिंता सतावू शकतात. मानसिक स्तरावरही काही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी समतोल साधावा. आत्मविश्वास कमी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा समस्याकारक ठरू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जमीन, मालमत्तांशी निगडीत कोर्ट-कचेऱ्यांमध्ये सावधानपूर्वक पावले टाकावीत. थंड पदार्थ शक्यतो टाळावेत. वाहनावरील खर्च वाढू शकतो.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग कन्या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतील. पराक्रमात वाढ होईल. मात्र, जोखीम पत्करून कोणतीही कामे करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरू शकतात. नोकरदार वर्गाला सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा कठीण ठरू शकतो. तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नये. विचारपूर्वक बोलावे. वाणीवर नियंत्रण ठेवावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाकडून सहकार्य मिळेलच असे नाही. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग या राशीच्या व्यक्तींना चिंताकारक ठरू शकेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबाशी सल्ला-मसलत करावी. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. योग आणि ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकेल.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग धनु राशीच्या व्यक्तींसाठी समस्याकारक ठरू शकतो. या कालावधीत आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विनाकारण खर्च करू नयेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. मात्र, परदेशात राहणाऱ्यांकडून शुभवार्ता मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग मकर राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. अनेक दिवसांपासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. कामातील चुका टाळण्याकडे भर द्यावा. भावंडांशी मतभेद होऊ शकतात.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. नातेसंबंध सुधारतील. नोकरीच्या ठिकाणी प्रतिमा उजळू शकेल. काही अज्ञान स्रोतातून धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. दाम्पत्य जीवनात आनंददायी अनुभव घेऊ शकाल.
मंगळ आणि केतु ग्रहाचा वृश्चिक राशीत होत असलेल्या संयोग मीन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. करिअरमध्ये यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. जोडीदाराशी असलेला ताळमेळ वाढेल. अन्य स्रोतातून धनलाभ होऊ शकतो. व्यवसाय, व्यापार, उद्योगात फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.