मंगळ-बुध योग: ‘या’ ७ राशींना १ महिना शुभ; अपार यश, प्रगती अन् सर्वोत्तम लाभाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:54 AM2023-01-05T08:54:05+5:302023-01-05T08:59:39+5:30

एकाच दिवशी दोन ग्रहांचे चलनबदल काही राशीच्या व्यक्तींना उत्तम फलदायी, अनुकूल ठरू शकेल. जाणून घ्या...

प्रत्येक ग्रह आपापल्या नियोजित कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. एखादा ग्रह वक्री झाल्यानंतर तो काही कालावधीनंतर मार्गी होत असतो. ग्रहांच्या या चलनाचा सर्व राशींवर प्रभाव पडत असतो. जानेवारी महिन्यात जुळून येत आहे. एक ग्रहाचा उदय होत आहे, तर दुसरा ग्रह मार्गी होत आहे.

जानेवारी महिन्यात एकाच दिवशी बुध आणि मंगळाचा योग जुळून येत आहे. १३ जानेवारी २०२३ रोजी मंगळ वृषभ राशीत मार्गी होत आहे, तर याच दिवशी बुध ग्रह उदय होत आहे. या दोन्ही ग्रहांच्या एकाच दिवशी जुळून येत असलेल्या योगाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे.

मात्र, काही राशीच्या लोकांना हा योग अतिशय लाभदायी सिद्ध होऊ शकतो. अनेकविध स्तरांवर उत्तम फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचे मार्गी चलन आणि बुध उदय शुभ ठरू शकेल? जाणून घेऊया...

वृषभ राशीच मंगळ मार्गी होत आहे. तसेच मंगळ आणि बुधाचा योग या राशीच्या व्यक्तींना खूप शुभ ठरू शकेल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. व्यापारी वर्गातील लोकांना एखादा नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर त्यासाठी काळ खूप चांगला आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे मार्गी चलन आणि बुधाचा योग उत्साह वाढवणारा ठरू शकेल. तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी लाभ मिळू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तुम्ही तुमचे प्रयत्न अधिक तीव्र करू शकता. कर्ज घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना यश मिळू शकेल. मनोरंजनावर खर्च कराल आणि आनंदी राहाल.

सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचे मार्गी चलन आणि बुध उदयाचा खूप शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकेल. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला असणार आहे. सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरी व्यवसायात लाभ मिळू शकतील. नवीन ऑर्डर किंवा टेंडरसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी वेळ खूप अनुकूल असेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचे मार्गी चलन आणि बुध उदय लाभदायक ठरू शकेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य आणि लाभ मिळेल. नशिबाची साथ लाभेल. संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांची शिक्षणाकडे आवड वाढेल. आर्थिक बाबतीतही लाभाची संधी मिळेल. लोखंड आणि धातूशी संबंधित व्यवसायात लाभाची स्थिती चांगली राहील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचे मार्गी चलन आणि बुध उदय सकारात्मक ठरू शकेल. धार्मिक कार्यात अधिक रस राहील. व्यवसायाच्या विस्तारासाठी जी काही योजना कराल ती खूप चांगली ठरू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. आर्थिक आघाडीवरही हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.

धनु राशीच्या व्यक्तींना मंगळ मार्गी होणे आणि बुध उदय अनुकूल ठरू शकेल. तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती सर्व खूप फलदायी ठरेल. तुम्ही कामे करण्यात खूप उत्साही असाल. असे केल्याने तुमचे मनोबल वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात यश मिळू शकते.

मीन राशीच्या व्यक्तींना मंगळ मार्गी आणि बुध उदय चांगले ठरू शकेल. आगामी काळात खूप अनुकूल परिणाम मिळू शकतील. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात खूप बदल झालेला दिसेल. आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये चांगले यश मिळवू शकता. तुमचे तुमच्या पालकांसोबतचे संबंध खूप चांगले राहतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.