२ महिने मंगळ वक्री: वृषभ प्रवेशाने ‘या’ ६ राशी लकी, धनलाभाचा मंगलमय काळ; तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:59 AM2022-11-15T11:59:13+5:302022-11-15T12:13:46+5:30

मंगळ वक्री चलनाने वृषभ राशीत विराजमान झाला असून, याचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसू येऊ शकेल. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

नवग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळ ग्रहाने वक्री चलनाने शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश केला आहे. पुढील सुमारे २ महिने मंगळ वृषभ राशीत वक्री चलनाने विराजमान असेल. (mars retrograde taurus november 2022)

मंगळ १२ जानेवारी २०२३ रोजी वृषभ राशीत मार्गी होणार आहे. मंगळ धैर्य, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, नेतृत्व, भावंड यांसह अनेक गोष्टींचा कारक मानला गेला आहे. मंगळाचे वक्री होणे काही राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकते, तर काही राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकतो. (mangal vakri in vrishabha rashi november 2022)

मंगळाचा वक्री चलनाने वृषभ राशीत होत असलेला प्रवेश केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पडणारा ठरू शकेल, असे सांगितले जाते. नेमक्या कोणत्या राशींवर आगामी काळात मंगळाची कृपा होऊ शकेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. आगामी काळात खर्चात वाढ होऊ शकेल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावेत. गुंतवणूक करणे देखील टाळावे. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबद्दल चिंता वाटेल.

वृषभ राशीत मंगळ वक्री चलनाने प्रवेश करत आहे. पुढील २ महिन्यांनी मंगळ याच राशीत मार्गी होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना हा काळ संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सकारात्मकता वाढू शकेल. परदेशात व्यवसाय असणाऱ्यांसाठी अनुकूल कालावधी ठरू शकेल. मालमत्ता खरेदीच्या योजना पुढे ढकलणे उपयुक्त ठरू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. भावंडांशी वाद होऊ शकतील. नात्यात कटुता येऊ शकेल. प्रवास करावे लागू शकतात. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जोडीदाराला वेळ देऊन संवाद वाढवणे हिताचे ठरू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे चांगले ठरू शकेल. मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. तुमचा स्वभावही थोडा हट्टी होऊ शकतो. तुमची पूर्ण एकाग्रता आणि ऊर्जा योग्य दिशेने लावण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे यशकारक ठरू शकेल. पदोन्नतीमुळे नोकरीत प्रगती होईल. खाजगी नोकरी करणाऱ्यांना आगामी काळ चांगला ठरू शकेल. मालमत्तेत लाभ मिळू शकेल. अनेक मार्गाने यश मिळू शकेल. मान-सन्मान वाढेल. प्रत्येक कामात यश मिळेल. कोणत्याही राजकीय कार्यात फायदा होऊ शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. तुमचे प्रमोशन अडकू शकते. अनेक गोष्टी त्रासदायक ठरू शकतील. उत्तम संवाद कौशल्याचा लाभ मिळू शकेल. कामे यशस्वी होऊ शकतील. अनेक गोष्टीत फायदा होईल. जास्त भावनिक होऊ नये. कोणावरही लवकर विश्वास ठेवू नका.

तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे लाभदायक ठरू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. संवाद कौशल्यात सुधारणा होऊ शकेल. काही कारणास्तव चिडचिड होऊ शकते.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे अनुकूल ठरू शकेल. दाम्पत्य जीवनात काही अडचणी येऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात खूप फायदा होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. मालमत्तेचे विभाजन होऊ शकते. परिस्थिती अनुकूल राहील. अहंकार दूर ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

धनु राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. दाम्पत्य जीवनात कुरबुरी होऊ शकतात. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. सरकारी खात्याशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला राहील. खूप काही शिकायला मिळेल. प्रमोशन मिळू शकते.

मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. एखाद्याशी वाद होऊ शकतो. दुसरीकडे धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. सरकारी खात्याशी संबंधित आणि सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ सिद्ध होईल. कोणत्याही कामात घाई करू नका.

कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे लाभदायक ठरू शकेल. आगामी काळात खूप फायदा होईल. करिअरमध्ये लाभ होऊ शकेल. प्रॉपर्टीशी संबंधित कोणत्याही कामात तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. वाहन खरेदी करू शकतात. करिअरमध्ये प्रगती होईल. अनेक सुवर्ण संधी मिळू शकतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे वक्री होणे सकारात्मक ठरू शकेल. आगामी काळात मेहनती वाढवावी लागेल. या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती होऊ शकेल. लग्नासाठी स्थळ येऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.