मंगळ गोचर: ८ राशींना शुभ फलदायी, पैशांची बचत शक्य; रियल इस्टेटमधून नफा, ५५ दिवस मंगलमय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:07 AM2024-08-23T07:07:07+5:302024-08-23T07:07:07+5:30

श्रावणी सोमवारी होत असलेले मंगळ ग्रहाचे गोचर कोणत्या राशींना शुभ पुण्य लाभदायी ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टचा महिना अनेकार्थाने महत्त्वाचा ठरला. श्रावण मास सुरु असलेल्या या महिन्यात अनेक शुभ योग, राजयोग, युती योग जुळून आले. यातच ऑगस्ट महिन्याची सांगता होताना मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन होत आहे.

श्रावणी सोमवारी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी मंगळ वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सुमारे ५६ दिवस मंगळ या राशीत असणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात मंगळ ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल.

मंगळाचे मिथुन राशीत होणारे गोचर अनेक राशींना लाभदायक, मंगलमय, अच्छे दिनाचे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. करिअर, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आर्थिक आघाडीवर मंगळ गोचराचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या काळात साहस, आक्रमकता वाढलेली दिसेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल. भावंडांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकाल. फायदा मिळेल. छंद पूर्ण करण्यावर अधिक भर द्याल. स्वयं विकासासाठी वेळ काढाल.

वृषभ: उत्पन्नात वाढ होऊ शकेल. कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी काही नवीन काम सुरू करू शकता. या काळात चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क: मंगळ गोचर शुभ फलदायी सिद्ध होऊ शकते. उत्पन्नात वाढ दिसेल. नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल. पैसे कमविण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होतील. पैसे वाचवू शकाल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होऊ शकतो.

सिंह: मंगळाचे गोचर अनुकूल ठरू शकते. या काळात नशिबाची साथ मिळू शकेल. काम किंवा व्यवसायासाठी प्रवास करावे लागू शकतील. जे शुभ सिद्ध होईल. बुद्धिमत्ता विकसित होऊ शकेल. ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

तूळ: मंगळ गोचराने पुरेसे पैसे कमविण्याची संधी मिळू शकेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली पदे मिळू शकतात. अनुकूल नशिबामुळे इच्छुकांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळू शकेल. कामाशी संबंधित प्रवासांमुळे आर्थिक लाभ आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. शुभकार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मकर: मंगळ गोचर लाभदायी तसेच फायदेशीर ठरू शकते. भौतिक सुख मिळू शकते. वाहन आणि मालमत्तेचे सुखही मिळू शकते. बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना आता करिअरमध्ये प्रगती आणि पगार वाढीसाठी चांगल्या संधी मिळू शकतील. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकेल. जर रिअल इस्टेट, प्रॉपर्टी संबंधित व्यवसाय करत असाल, तर नफा मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ: उच्च शिक्षणात यश मिळेल. या काळात मुले जास्त वेळ घालवण्याची मागणी करू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

मीन: मंगळ गोचराने सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकतात. कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकेल. काही लोकांना प्रमोशन मिळू शकते. विशेषत: रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. वारशाने मिळालेल्या मालमत्तेतून महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.