४० दिवस मंगळ-राहु अंगारक योग: ७ राशींना लाभ, टेंडरमधून नफा; उधारी मिळणे शक्य, वरदान काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 02:18 PM 2024-04-23T14:18:19+5:30 2024-04-23T14:28:19+5:30
मंगळ आणि राहु यांच्या युती योगाचा तुमच्यावर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करत आहे. मीन राशीत शुक्र, बुध आणि राहु विराजमान आहे. त्यामुळे मीन राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. मात्र, लगेचच शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीन राशीत त्रिग्रही योग राहील.
मंगळ आणि राहु यांच्या युतीने अंगारक योग जुळून येत असल्याचे सांगितले जाते. ०१ जून रोजी मंगळ मीन राशीतून स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत मीन राशीत मंगळ आणि राहुचा अंगारक योग राहणार आहे. हा योग अनेक बाबतीत प्रतिकूल मानला जातो.
मात्र, मंगळ आणि राहुचा अंगारक योग काही राशींना लाभदायक ठरणार आहे. ४० दिवसांपर्यंत अंगारक योगाचा प्रभाव राहू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना अंगारक योग लाभदायक ठरणार आणि कोणत्या राशींना तापदायक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
मेष: मंगल गोचराने धावपळ आणि अधिक खर्चाचा सामना करावा लागू शकेल. सावधपणे प्रवास करावा. आणि वाहनांचे अपघात टाळा. वादाची प्रकरणे आपापसात सोडवणे शहाणपणाचे ठरेल. कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कर्जाचे मोठे व्यवहार टाळावे. योजना गोपनीय ठेवून काम केल्यास अधिक यशस्वी व्हाल.
वृषभ: सर्व प्रकारे उत्तम यश मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध दृढ होतील. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. यशाची आलेख वाढता राहू शकेल. मात्र, मानसिक अशांततेचा सामना करावा लागू शकतो. मुलांशी संबंधित चिंता दूर होतील. कार्यक्षेत्र विस्तारत राहील.
मिथुन: चढ-उतारांचा सामना करावा लागला तरी, चांगले यश मिळेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतील. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करायची असेल, तर त्या दृष्टीनेही हा काळ अतिशय अनुकूल राहील. सरकारी खात्यात नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर संधी चांगली आहे. टेंडर इत्यादीसाठी अर्ज करायचा असेल तर काळ अनुकूल राहील.
कर्क: मंगळाच्या प्रभावामुळे साहस वाढू शकेल. कठीण प्रसंगांवरही सहज नियंत्रण ठेवू शकाल. कुटुंबातील तरुण सदस्यांशी मतभेद वाढू देऊ नका. गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येऊ शकाल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. गुप्त शत्रूंचा पराभव होईल. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल.
सिंह: अनेक अनपेक्षित चढ-उतारांचा सामना करावा लागू शकेल. रणनीती आणि योजना गोपनीय ठेवून काम केले तर पूर्णपणे यशस्वी व्हाल. काळजीपूर्वक प्रवास करा. वादग्रस्त प्रकरणे सोडवा. कामाच्या ठिकाणीही षड्यंत्राचे बळी होण्याचे टाळा. वडिलोपार्जित मालमत्ता विकणे टाळा. कुटुंबात विभक्तता निर्माण होऊ देऊ नका.
कन्या: मंगळाचे मीन गोचर संमिश्र परिणाम देणारे ठरू शकेल. कामाची व्याप्ती वाढेल. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. सासरच्यांशी संबंध बिघडू देऊ नका. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. इतर देशांसाठी व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टीनेही काळ अनुकूल राहील.
तूळ: जीवनातील अडचणी कमी होऊ शकतील. जास्त धावपळ आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कामाची व्याप्ती वाढत राहील. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत ग्रहांचे गोचर अनुकूल राहील. हाती घेतलेल्या कामांत यश मिळेल.
वृश्चिक: विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी हा एक उत्तम यशाचा घटक असेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही यशस्वी व्हाल. अग्निशमन विभागात नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टीनेही वेळ अनुकूल राहील. मुलांशी संबंधित चिंता दूर होतील.
धनु: एकाबाजूला यश मिळत असले तरी, कुठेतरी कौटुंबिक कलह आणि मानसिक अशांततेचा सामना करावा लागू शकतो. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता आहे. चढ-उतार असले तरी मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सुटतील. घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकेल. कुटुंबात शुभ कार्याची संधी मिळेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल. ज्याचा परिणाम लाभदायी असेल.
मकर: मंगळाचे मीन गोचर वरदानसारखे ठरू शकेल. यश मिळेल. कठीण प्रसंगांवरही नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि भाऊ यांच्याशी मतभेद वाढू देऊ नका. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. दुसऱ्या देशासाठी व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर, सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
कुंभ: सुखद आणि आनंददायी परिणाम प्राप्त होऊ शकतात. बोलण्याच्या कौशल्याच्या जोरावर कठीण प्रसंगांवर सहज नियंत्रण ठेवू शकाल. आर्थिक बाजू मजबूत होईल. दिलेले पैसेही परत मिळणे अपेक्षित आहे. रणनीती आणि योजना गुप्त ठेवून काम केल्यास अधिक यशस्वी व्हाल.
मीन: मंगळाचे गोचर यशकारक ठरू शकेल. जास्त कामामुळे थकवा जाणवेल. आर्थिक बाजू मजबूत असेल. सरकारी सेवेसाठी अर्ज करायचा असला तरी हा काळ खूप अनुकूल असेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल. कुटुंबात शुभ कार्यासाठी शुभ संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर यशाची शक्यता सर्वाधिक आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.