मंगळ गोचराने गुरुशी युती योग: ७ राशी लकी, अचानक मोठे लाभ; नोकरीत पदोन्नती; सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:48 PM2024-07-05T14:48:34+5:302024-07-05T14:57:39+5:30

नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रहाच्या गोचराने कोणत्या राशींसाठी मंगलमय काळ सुरू होऊ शकतो? जाणून घ्या...

जुलै महिन्यात ग्रह गोचरामुळे काही विशेष योग जुळून येत आहेत. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. तर आताच्या घडीला वृषभ राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह आहे. मंगळाच्या वृषभ प्रवेशाने गुरु आणि मंगळ यांचा युती योग जुळून येणार आहे.

मंगळ ग्रह सुमारे ४५ दिवस एखाद्या राशीत विराजमान असतो. १२ जुलै रोजी मंगळ ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. विद्यमान घडीला मंगळ स्वराशीत म्हणजेच मेष राशीत आहे. मंगळाचा वृषभ राशीत होणारा प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो.

मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत होणारा प्रवेश आणि गुरु ग्रहाशी जुळून येणारा युती योग काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकतो. आगामी काळ इच्छापूर्तीचा ठरू शकतो. कोणत्या राशी ठरतील लकी? जाणून घ्या...

मेष: प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात येऊ शकतो. व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. उत्पन्न वाढू शकते. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. मालमत्ता, वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकते.

वृषभ: गुरू आणि वडिलांकडून काही मोठा फायदा होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. शिक्षण घेण्याचे किंवा परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात करणे फायदेशीर ठरू शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. बिझनेसमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढू शकेल.

मिथुन: प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. जोडीदारासोबत सुरू असलेले सर्व गैरसमज दूर होतील. नवीन मालमत्ता खरेदी-विक्रीची योजना आखू शकाल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी मिळू शकतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक काम केल्यास उत्तम लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला दिला जात आहे.

कर्क: दीर्घकाळ अपूर्ण राहिलेल्या सर्व योजनांचा विस्तार करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा पैसे कुठेतरी अडकू शकतात, असा सल्ला दिला जात आहे.

तूळ: आगामी काळात मालमत्तेच्या बाबतीत अनुकूलता राहील. मालमत्तेशी संबंधित काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतील. अनावश्यक खर्चामुळे थोडे उदास राहू शकता. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधात आहेत त्यांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर केला करावा.

वृश्चिक: आगामी काळात मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. भावंडांकडून थोडे कमी सहकार्य मिळू शकते.

मीन: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. नोकरदारांना बरेच फायदे मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तसे करू शकता. याचा फायदा मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. अध्यात्माकडे अधिक कल असेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.