May Astro 2025: 'मे' मध्ये अनेक ग्रहांचे स्थित्यंतर; 'या' पाच राशींच्या आयुष्यात घडणार मोठा बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:45 IST2025-04-24T12:35:50+5:302025-04-24T12:45:35+5:30

May Astro 2025: मे महिन्यात गुरू, शुक्र, राहू, केतू, बुध आणि सूर्य हे ६ प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ग्रहांमध्ये होणाऱ्या मोठ्या बदलामुळे, ५ राशींचे भाग्य उजळणार आहे! ज्यात करिअरसोबतच कौटुंबिक सौख्यही लाभणार आहे.

मे महिन्यात ६ ग्रहांचे मोठे परिवर्तन होणार आहे. मे महिन्यात सूर्य, बुध, गुरु, राहू-केतू आणि शुक्र हे त्यांचे राशी बदलतील. या महिन्यात, दोन सर्वात महत्वाचे संक्रमण गुरू आणि राहू-केतूचे असणार आहेत. सुमारे १८ वर्षांनी, राहू कुंभ राशीत पोहोचेल आणि केतू सिंह राशीत पोहोचेल. या महिन्यात, गुरू आक्रमक हालचालीसह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. हा मोठा बदल ५ राशींसाठी शुभ आणि लाभदायी ठरणार आहे. त्या राशी कोणत्या ते पाहू!

मे महिन्यात ग्रहांच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य वेगाने बदलेल. याचा अर्थ असा की या महिन्यात आर्थिक लाभ आणि प्रगती मिळण्यासोबतच तुम्हाला धन आणि संपत्तीचा लाभ होईल. या महिन्यात तुम्ही वाहन खरेदी करू शकता किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता. त्याच्यासोबत असण्याने तुम्हाला यश मिळू शकते. तसेच या काळात कुटुंबात शुभ कार्य होऊ शकते. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याची योजना देखील आखू शकता.

मे महिन्यात ग्रहांच्या स्थित्यंतरामुळे तुमच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या सुखसोयींवर खूप पैसे खर्च करू शकता. जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या काळात फायदा मिळू शकेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हाल. याशिवाय, तुमचे उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील. कौटुंबिक सौख्य देणारा हा काळ असेल. आप्त स्वकीयांच्या भेटी होतील.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून सूर्य भाग्यस्थानात असल्याने, सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या बिघडलेल्या कामांमध्ये सुधारणा दिसून येईल. तसेच या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात येणारे सर्व अडथळे संपतील आणि कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. एखाद्या शुभ कार्यावर पैसे खर्च होतील. तथापि, शनीच्या धैयाच्या प्रभावामुळे, या काळात तुमचे खर्च देखील जास्त राहू शकतात.

तूळ राशीच्या लोकांसाठी, मे महिन्यात शुक्र उच्चस्थानी असल्याने, कुटुंबात चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तसेच, या काळात व्यावसायिकांचे नशीबही बदलेल. त्यांना या महिन्यात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काही कामानिमित्त वा हौसेसाठी अतिरिक्त पैसे खर्च होतील, परंतु त्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. जोडीदाराच्या साथीमुळे हा काळ सुखाचा जाईल. सहलीचे बेत आखले जातील.

मे महिन्यात सूर्य उच्च स्थानात चौथ्या घरात भ्रमण करत असल्याने मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ दिसेल. तुमच्या कुटुंबात खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांनाही पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. वडिलांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील. तसेच, कुटुंबात काही शुभ कार्य घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. पालकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.