बुधाचा कर्क राशीत उदय: ६ राशींना शुभ, पद-पैसा वाढेल; सरकारकडून लाभ, यश-प्रगतीचा सुखद काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 07:07 AM2023-07-14T07:07:07+5:302023-07-14T07:10:02+5:30

कुंडलीत बुध बलवान असतो, तेव्हा व्यवसायासह जीवनाच्या बहुतांश क्षेत्रात यश मिळून चांगले परिणाम प्राप्त होतात, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कौशल्य, यश, तर्क क्षमता, बुद्धिमत्ता यांचा कारक आहे. २२ जून रोजी बुध वृषभ राशीत अस्तंगत झाला होता. आता बुध ग्रह कर्क राशीत उदय होत आहे. कुंडलीत बुध ग्रह बलवान असतो, तेव्हा व्यक्तीला व्यवसायासह जीवनाच्या बहुतांश क्षेत्रात यश मिळते आणि चांगले परिणाम प्राप्त होतात, असे सांगितले जात आहे.

एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते.

आताच्या घडीला बुध कर्क राशीत आहे. तर नवग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीत आहे. बुध एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो किंवा उदय होतो, तेव्हा देश-दुनियेसह व्यवसाय, आर्थिक स्थिती यासह सर्व १२ राशींवर त्याचा परिणाम होतो. बुधाचा उदय काही राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक तसेच शुभ फलदायी सिद्ध होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचा उदय शुभ फलदायी ठरू शकतो. कामांमध्ये चांगली प्रगती दिसून येऊ शकेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. कुटुंबातील शुभ कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल. पद आणि प्रभावात वाढ होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. मित्र व प्रियजनांचे सहकार्य कायम राहील. तुमच्या कार्याचा आदर केला जाऊ शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा उदय सकारात्मक ठरू शकेल. प्रयत्नांना यश मिळू शकेल. मान-सन्मानात वाढ होऊ शकेल. मन धार्मिक कार्यात गुंतलेले असेल. करिअरमध्ये यश आणि प्रगती होईल. धनप्राप्ती करण्यात यश मिळेल. नोकरदारांना चांगल्या संधी मिळतील. समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. प्रभावही वाढेल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचा उदय फायदेशीर ठरू शकेल. जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय वाढीसाठी व्यवसायात नवीन धोरणांवर काम कराल. यश मिळेल. परदेशात राहणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगती दिसेल. आर्थिक लाभ मिळू शकतील. नोकरदारांना आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी इतर मार्ग शोधावे लागू शकतात. नियोजन करून चांगली कामगिरी करता येऊ शकेल. आर्थिक नफा मिळू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचा उदय शुभ मानला जात आहे. प्रतिस्पर्ध्यांशी कडवी टक्कर द्याल. पैसा मिळवण्यात यश मिळेल. व्यवसायात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. घर किंवा जमीन खरेदी करू शकाल. मुलांच्या करिअरमध्ये प्रगती झाल्याने मन समाधानी राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्साही वाटेल. कुटुंबासह तीर्थयात्रेला जाण्याची योजना करू शकतात.

मकर राशीच्या व्यक्तींना बुधाचा उदय अनुकूल ठरू शकेल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट राहील. कामाच्या ठिकाणी चांगल्या कामगिरीसाठी मेहनत कराल. गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. नशिबाच्या जोरावर कामे सहज पूर्ण होतील. सरकारी अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता, जो फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधाचा उदय लाभदायक ठरू शकेल. व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. खर्च कमी करण्यात यश मिळू शकेल. कार्यक्षेत्रात मित्र आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. धनप्राप्ती करण्यात यश मिळेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. मान-सन्मान मिळू शकेल. कीर्ती वाढेल. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. भरघोस नफा मिळू शकेल. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.