१ महिना शुभ-लाभ! बुध धनु राशीत मार्गी, ‘या’ ९ राशींना भरघोस फायदा; जबरदस्त कमाई, उत्तम संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:44 AM2023-01-19T06:44:14+5:302023-01-19T06:44:14+5:30

शुभ मानला गेलेला बुध ग्रह गुरुच्या धनु राशीत मार्गी झाला आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनी ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत मार्गी झाला आहे. बुध ग्रहाचे मार्गी होणे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. ०७ फेब्रुवारी रोजी बुध शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत सूर्यासोबत विराजमान होईल. (mercury direct in sagittarius 2023)

१८ जानेवारी २०२३ रोजी बुध धनु राशीत मार्गी झाला आहे. आता ०७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत बुध धनु राशीत विराजमान असणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो, जो व्यापार, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती इत्यादींचा कारक आहे. बुध ग्रहाचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर सूर्य आणि बुधाचा अत्यंत शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येईल. (budh margi in dhanu rashi 2023)

बुध आपल्या गुरुच्या धनु राशीत राहील. शनी बुधापासून तिसऱ्या स्थानी आहे. तर गुरु चौथ्या स्थानी आहे. तसेच सूर्य आणि शुक्र बुध ग्रहापासून दुसऱ्या स्थानी आहेत. बुध मार्गी होण्याचा अनेक राशींना लाभ मिळणार असून, काही राशींसाठी तो सर्वोत्तम, तर काही राशींसाठी संमिश्र काळ ठरू शकेल. मेष ते मीन या सर्व राशींवर बुध मार्गी होण्याचा काय प्रभाव पडू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. या काळात मानसिकदृष्ट्या संतुलित असाल. करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. वडिलांसोबतच्या नातेसंबंधातही तुम्हाला सुधारणा दिसून येईल. नशिबाची उत्तम साथ आणि पाठबळ मिळू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहावे लागेल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरू शकेल. तुम्हाला चांगला करार मिळू शकतो. गुप्तपणे केलेली गुंतवणूक भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. वैवाहिक जीवनात चांगले बदल होऊ शकतात. सामाजिक स्तरावर मान-सन्मान मिळेल. भागीदारीत व्यवसाय केल्यास नफा मिळू शकतो. कला, लेखन, गायन या क्षेत्रांत कार्यरत आहेत, त्यांची प्रतिभा बहरेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. आगामी काळ थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावे लागेल. गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करणे टाळा. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर वेळ वाया घालवणे टाळा आणि तुमचे प्रयत्न वाढवा. तुम्हाला तुमच्या तब्येतीचीही थोडी काळजी घ्यावी लागेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे फलदायी ठरू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही सशक्त असाल. बुधचे चलनबदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे शुभ ठरू शकेल. कुटुंबात शुभ कार्यही घडू शकतात. आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. या काळात घर किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकतात.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. योग्य निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. तुमचे संभाषण कौशल्य सुधारू शकेल. पत्रकारिता किंवा राजकारणाच्या क्षेत्रात आहेत त्यांना भरपूर नफा मिळू शकतो.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. बौद्धिक क्षमता वाढेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच यावेळी वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होऊ शकते. तुमचे बोलणे अधिक प्रभावी होऊ शकेल.

धनु राशीत बुध मार्गी होत आहे. या राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. या काळात तुमची तार्किक क्षमता वाढेल. करिअरच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. या राशीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात काही आव्हाने असली तरी एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

मकर राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकतात. योग्य बजेट योजना बनवून पुढे जाणे चांगले होईल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र हा काळ लाभदायक ठरेल. त्यांना भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. अनेक स्रोतांमधून नफा मिळवू शकतात. कौटुंबिक वातावरणातही चांगले बदल होतील, मोठ्या भावंडांशी संबंध सुधारतील. तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता तुम्हाला नफा मिळू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधचे धनु राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तुम्ही दीर्घकाळ कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यातही फायदा मिळू शकतो. व्यवसायाची स्थितीही चांगली होऊ शकते. नवीन व्यवसायही सुरू करू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.