बुधाचा शुभ प्रभाव: 'या' ३ राशींच्या व्यक्तींचा भाग्योदय काळ; विद्यार्थ्यांना मिळेल अपार यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:15 PM2022-02-10T20:15:52+5:302022-02-10T20:20:04+5:30

बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह आहे.

ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह आहे. बुध शुभ असेल तर व्यक्ती भाग्यवान ठरते.

आताच्या घडीला बुध हा शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत मार्गी चलनाने विराजमान झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ६ मार्चपर्यंत काही राशींवर बुध ग्रहाची कृपा असेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी ६ मार्चपर्यंतचा काळ खूप शुभ असणार आहे.

वृषभ - Marathi News | वृषभ | Latest bhakti Photos at Lokmat.com

कामात यश मिळेल. पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. या काळात तुम्हाला क्षेत्रात यश मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. धन आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - Marathi News | वृश्चिक | Latest bhakti Photos at Lokmat.com

तुमची अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली बातमीही मिळू शकेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी चांगला काळ आहे. अचानक आर्थिक लाभही संभवतो. कामाचं शुभ फळ मिळेल. तुमच्या वाणीत गोडवा राहील. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

धनु - Marathi News | धनु | Latest bhakti Photos at Lokmat.com

या दरम्यान तुमच्या बोलण्यात गोडवा येईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. इमारत आणि वाहन सुख प्राप्त होऊ शकते. बुधाचे गोचर विद्यार्थ्यांसाठी उत्तम सिद्ध होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.