बुधाचा त्रिग्रही योग: ७ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वृद्धी; सुख-समृद्धी, सूर्य-शनी शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 01:01 PM2024-02-14T13:01:56+5:302024-02-14T13:09:10+5:30

शनीच्या राशीत होत असलेल्या बुध गोचराने काही राशींना उत्तम फायदा, मालामाल होण्याची संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

नवग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत विराजमान झाल्यानंतर आता नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला बुध अस्तंगत अवस्थेत असून, कुंभ राशीत गोचर करणार आहे. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी कुंभ राशीत विराजमान आहे. शनी ग्रहही अस्तंगत आहे.

बुध ग्रहाच्या कुंभ राशीतील प्रवेशाने सूर्य-शनी-बुध यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. तसेच सूर्य आणि बुधाचा राजयोग मानला गेलेला बुधादित्य योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग काही राशींना शुभ, लाभदायक ठरू शकतात, असे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान असलेला बुध २० फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ०७ मार्चपर्यंत बुध कुंभ राशीत असेल, असे सांगितले जात आहे. बुधाचा कुंभ राशीतील प्रवेश, बुधादित्य, त्रिग्रही योगाचा कोणत्या राशींना आर्थिक आघाडी, नोकरी, व्यवसाय, करिअर यांमध्ये यश-प्रगतीची संधी, लाभ मिळू शकतो, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर खूप चांगले ठरू शकेल. बुध, सूर्य आणि शनी त्रिग्रही योगाचा खूप फायदा मिळू शकेल. आनंद आणि समाधान लाभेल. करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा लाभ मिळू शकतो. जोडीदारासोबत नाते मजबूत होऊ शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुध गोचर, त्रिग्रही योग प्रगती आणि यशाचा ठरू शकेल. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. प्रगती आणि यशाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील. जोडीदारासोबतचे नाते मजबूत होऊ शकेल. दोघांमध्ये चांगला समन्वय राहू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे गोचर, त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकेल. लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. हा प्रवास अपार यश घेऊन येणारा ठरू शकेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. जोडीदारासोबत खूप आनंदी राहू शकाल.

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधादित्य त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळू शकेल. व्यापारीही प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देऊ शकतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

धनु राशीच्या व्यक्तींना बुध गोचर, त्रिग्रही योगाने नफा आणि यश मिळू शकेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ खूप चांगला ठरू शकेल. चांगला नफा मिळेल. चांगली रक्कम वाचवण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांना गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना बुध गोचर, त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. बुधाच्या शुभ प्रभावामुळे अनेक कामांमध्ये यश मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय मिळू शकतात.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर, त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. कार्यशैली सुधारेल. पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. ही संधी समाधान देईल. व्यक्तिमत्व सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असेल. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.