बुधचा मेष प्रवेश: ‘या’ ७ राशींना ६९ दिवस शानदार, उत्तम फलदायी काळ; २ महिने होईल शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:07 AM2023-04-03T07:07:07+5:302023-04-03T07:07:07+5:30

बुध सुमारे २ महिने मेष राशीत विराजमान असेल. बुध गोचराचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजकुमार बुध मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजमान झाला आहे. बुध ग्रह मेष राशीत तब्बल २ महिन्यांहून अधिक काळ असेल, असे सांगितले जात आहे. मेष राशीतच बुध वक्री होणार आहे आणि त्यानंतर याच राशीत मार्गी होऊन सुमारे ०७ जून रोजी बुध शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

बुधचा मेष प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. आताच्या घडीला मेष राशीत राहु विराजमान आहे. यामुळे बुध आणि राहुचा युती योग जुळून येईल. यानंतर एप्रिल महिन्याच्या मध्यावर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या मेष प्रवेशानंतर बुध आणि सूर्याचा बुधादित्य योग जुळून येऊ शकेल. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला मेष संक्रांती असे संबोधले जाईल.

एप्रिल महिन्यात आणखी एक महत्त्वाचे राशीपरिवर्तन होणार आहे, ते म्हणजे गुरुचे. गुरु ग्रह स्वराशी असलेल्या मीन राशीतून मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करेल. यानंतर सूर्य, बुध, राहु आणि गुरु यांचा चतुर्ग्रही योग जुळून येऊ शकेल. बुधाच्या मेष प्रवेशाचा कोणत्या राशींना लाभ होऊ शकेल, कोणत्या राशींना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष राशीत बुध विराजमान झाला आहे. या राशींच्या व्यक्तींना आगामी काळात सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र, तुमचे बुद्धिचातुर्य, उत्तम बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर यावर मात करू शकाल. व्यासायिक भागीदारीत सुधारणा होऊ शकते. भागीदाराचे संपूर्ण सहकार्य या काळात प्राप्त होऊ शकते.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. अचानक पैसे खर्च होऊ शकतात. मात्र, नोकरदार वर्गासाठी बुधाचे गोचर शुभ फलदायी सिद्ध होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश अनुकूल ठरू शकेल. सामाजिक वर्तुळ वाढू शकेल. मात्र, विद्यार्थ्यांसाठी हे बुधाचे गोचर अत्यंत फलदायी ठरू शकेल. या राशीचे लोक जनसंवाद, लेखन आणि कोणत्याही भाषेच्या क्षेत्राशी निगडित आहेत, तर त्यांच्यासाठीही काळ चांगला राहील.

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश शानदार ठरू शकेल. नोकरदार लोकांसाठी हे संक्रमण शुभ असणार आहे, जे कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहेत. या काळात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवन चांगले असू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश फलदायी ठरू शकेल. जे शिक्षक क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ फलदायी ठरू शकेल. या काळात तुमच्या संवाद पद्धतीमुळे लोक प्रभावित होतील. जे उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. भावंडांसोबत नाते चांगले राहील. तसेच भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश काहीसा समस्याकारक ठरू शकेल. बुधाचे हे संक्रमण काही आव्हाने घेऊन येणारे ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. स्वतःवर नियंत्रण ठेवून काम करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे आर्थिक बाबतीत आगामी काळ चांगला ठरू शकेल. बचती वाढ होऊ शकेल. मात्र, खर्चांवर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश सामान्य ठरू शकेल. या काळात काम करताना सावध राहावे लागेल. आवश्यक कागदपत्रे दोनदा तपासून घ्यावीत. आगामी काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्यासोबत भागीदारीत काम करण्याचा विचार करत असाल तर फायदा होऊ शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आगामी काळात मित्रही शत्रूसारखे वागू शकतात. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला जात आहे. पैशाच्या बाबतीतही सावध राहण्याची गरज आहे. कोणालाही कर्ज देऊ नका. अन्यथा ते पैसे परत मिळताना समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. या काळात आर्थिकदृष्ट्या कोणताही मोठा निर्णय घेणे टाळणे उपयुक्त ठरू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश अनुकूल ठरू शकेल. हा काळ चांगला जाऊ शकेल. वैयक्तिक जीवन मजबूत होऊ शकेल. प्रेमात असलेल्यांना आपले नाते पुढे न्यायचे आहे असेल, तर त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल. व्यवसाय आणि भागीदारीमध्ये बदल करण्यासाठी हा काळ सकारात्मक ठरू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. नातेवाईकांसोबत आनंददायी वेळ घालवू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी बुधाचे हे संक्रमण यश मिळवून देणारे ठरू शकेल. जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी लागेल. तयारीनिशी परीक्षेसाठी जाणे हिताचे ठरू शकेल. वडील आणि गुरू यांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळू शकतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश अनुकूल ठरू शकेल. तीर्थस्थळी जाण्याची योजना बनवू शकाल. भावंड आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येऊ शकेल. नातेवाईकांसोबत फिरायला जाण्याचे बेत आखू शकाल. यामुळे नातेसंबंध मजबूत होण्यास मदत मिळू शकेल. वडील तुमच्या कामासाठी मेहनत घेताना दिसू शकतील. वडिलांसोबतचे नाते दृढ होऊ शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधचा मेष प्रवेश अनुकूल ठरू शकेल. कुटुंबीयांसह धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी जाऊ शकता. कौटुंबिक जीवन चांगले असू शकेल. भावंडांसोबत नाते मजबूत होऊ शकेल. सासरच्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.