बुधचा शनीच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मीची महाकृपा, लाभच लाभ; २० दिवस सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 06:55 AM2023-02-08T06:55:40+5:302023-02-08T06:55:40+5:30

फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रह दोन वेळा राशीपरिवर्तन करणार आहे. बुधच्या पहिला राशीपरिवर्तनाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला बुध फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा राशीपरिवर्तन करणार आहे. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी बुध गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करत आहे. आताच्या घडीला मकर राशीत नवग्रहांचा राजा सूर्य विराजमान आहे. (mercury transit in capricorn 2023)

बुध ग्रह मकर राशीत साधारण २० दिवस विराजमान असेल. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस २७ फेब्रुवारी २०२३ रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. मकर राशीत बुधाचा सूर्यासोबत बुधादित्य योग जुळून येईल. तर कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर बुध, सूर्य आणि शनीचा त्रिग्रही योग जुळून येईल. (budh gochar in makar rashi 2023)

मकर राशीत होत असलेला बुधाचा प्रवेश सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल. तसेच लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. काही राशींना या कालावधी उत्तम लाभ, धनवृद्धीचे शुभ योग, नोकरी, करिअरमध्ये संधी मिळू शकतात, तर काही राशीच्या व्यक्तींना हा कालावधी काहीसा संमिश्र स्वरुपाचा ठरू शकेल, तुमच्यासाठी बुधचा मकर प्रवेश कसा असेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश अनुकूल ठरू शकेल. पराक्रम आणि साहस वाढू शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. सर्व कामांचे शुभ परिणाम मिळतील. नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला उत्तम संधी मिळू शकतात. व्यवसायातही शुभ योग बनत आहेत. मालमत्ता खरेदीत लाभ होण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास तुळशीला दररोज पाणी द्यावे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. नियोजित कामे काही कारणाने रखडतील. पैशाअभावी काही कामे थांबू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मात्र, कालांतराने परिस्थितीत चांगली सुधारणा दिसून येऊ शकेल. लक्ष्मी देवीच्या कृपेने कामे मार्गी लागू शकतील. कामानिमित्त प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. सासरच्या मंडळींकडून लाभ होऊ शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश शुभ परिणामकारक ठरू शकेल. फायदेशीर घटना घडतील. कामांमधून नफा मिळेल. यश मिळेल. सामाजिक स्तरावर मान-सन्मान मिळू शकतील. मित्रांकडून लाभ मिळेल. सासरच्यांशी संबंध सुधारतील. मात्र, आरोग्याच्या काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश मध्यम फलदायी ठरू शकेल. काही लोकांशी मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा काळ सर्व बाबतीत मध्यम राहू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश अनुकूल ठरू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. शुभ फलांची प्राप्ती होऊ शकेल. विरोधक शांत राहतील. प्रगतीकारक संधी मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. नफा कमावण्याची चांगली संधी मिळेल. समाधान मिळेल. शक्य असल्यास सरस्वती देवीला पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही कारणाने तुमच्या मनात अस्वस्थता वाढेल. बेचैनी वाढू शकेल. मुलांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे. तणाव वाढू शकतो. नोकरी, व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, उत्पन्न वाढू शकेल. अतिआत्मविश्वास टाळावा.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश सुख-समृद्धीकारक ठरू शकेल. मालमत्ता खरेदी करू शकता. यामध्ये चांगला फायदा होऊ शकेल. दिग्गज व्यक्तींशी ओळखी होऊ शकतील. त्याचा फायदा होऊ शकेल. पैशाच्या बाबतीतही हे संक्रमण फायदेशीर ठरेल. शक्य असल्यास श्रीविष्णु सहस्त्रनामाचे पठण करावे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामात अडथळे येतील. खर्चांकडेही लक्ष द्यावे लागेल. कोणाशीही वाद घालणे टाळावे. मानसिक त्रास संभवतो. आत्मविश्वासाने काम करा पण कोणतीही रिस्क घेऊ नका. शक्य असल्यास दररोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे.

धनु राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश संमिश्र ठरू शकेल. हितशत्रू नुकसान करू शकतात. पण, चातुर्याने वागल्यास हितशत्रू पराभूत होऊ शकतील. शुभ परिणाम मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांच्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. समाजातील ओळखी वाढतील. भावंडांशी वाद होऊ शकतो. शक्य असल्यास दर बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा.

बुध धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे. मकर राशीच्या व्यक्तींना बुधचा प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. वडिलांचे सहकार्य मिळेल, परंतु कोणत्याही गोष्टीवरून संबंध बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ नाही. अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात. धार्मिक कार्यामुळे मानसिक शांतता लाभू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. काही कारणाने मानसिक तणाव येऊ शकतो. विद्यार्थ्यांना कामात अडथळे येऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात विरोधकांचा त्रास सहन करावा लागू शकेल. खर्च वाढू शकतील. अचानक काही कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. शक्य असल्यास दर बुधवारी बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करावा.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधचा मकर प्रवेश शुभ फलदायी ठरू शकेल. रखडलेली कामे मार्गी लागू शकतील. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. नशिबाची साथ मिळू शकेल. आर्थिक आघाडीवर चांगले परिणाम मिळतील. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. नोकरदारांची आर्थिक स्थिती सुधारेल. अपेक्षित चांगले निकाल मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.