Budhaditya Yoga 2022: मीन राशीत बुधादित्य योग: ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती होतील मालामाल; उत्तम नानाविध लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 02:49 PM2022-03-23T14:49:04+5:302022-03-23T14:52:45+5:30

Budhaditya Yoga 2022: बुधादित्य योगाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा फायदा होऊ शकतो? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांमधील सर्व ग्रह नियोजित वेळेने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह २४ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. ०८ एप्रिलपर्यंत बुध मीन राशीत विराजमान असेल. त्यानंतर १५ एप्रिल रोजी बुध उदय होईल, असे सांगितले जात आहे. (Budhaditya Yoga 2022)

आताच्या घडीला मीन राशीत नवग्रहांचा राजा सूर्य ग्रह विराजमान आहे. बुधच्या मीन राशीतील प्रवेशानंतर बुधादित्य नामक योग जुळून येत आहे. याचा सर्व राशींवर प्रभाव पडणार असल्याचे सांगितले जात आहे. (budh in meen rashi 2022)

बुधादित्य योग हा शुभ मानला जातो. मीन राशीत जुळून येणाऱ्या बुधादित्य योगामुळे काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत ५ राशीच्या व्यक्तींना यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. करिअर, उद्योग आणि जीवनातील विविध टप्प्यांवर लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. जाणून घ्या... (budhaditya yoga of budh in meen rashi 2022)

मीन राशीतील बुधादित्य योग वृषभ राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकतो. मीडिया, फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांना आगामी कालावधी प्रगतीकारक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रशंसा, कौतुक होऊ शकते. व्यापार, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही सकारात्मक काळ जाऊ शकतो. शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल. प्रवासाचे योग संभवतात. अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल.

मीन राशीतील बुधादित्य योग मिथुन राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकतील. हितशत्रूंपासून सावध राहावे. जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग जुळून येतील. प्रवास लाभदायक ठरतील. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.

मीन राशीतील बुधादित्य योग कन्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतो. भागीदारीतील व्यवसाय, व्यापार, उद्योगांना फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहू शकते. खर्चाचा ताळेबंद योग्य ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करावी. बचतीच्या योजना करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

मीन राशीतील बुधादित्य योग वृश्चिक राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. विद्यार्थ्यांना आगामी काळात स्पर्धा परीक्षांत यश मिळू शकते. परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना शुभवार्ता मिळतील. मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना उत्तम कालावधी. समाजात मान, सन्मान प्राप्त होऊ शकते. लोकप्रियता वाढू शकेल. राजकीय क्षेत्रातील लोकांना लाभदायक काळ.

मीन राशीतील बुधादित्य योग कुंभ राशीतील व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक स्तरावर लाभ होऊ शकतील. धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. येणी वसूल होऊ शकतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकतील. कुटुंबात सुख, समृद्धी, आनंदाचे वातावरण राहू शकेल.

बुधादित्य योगाचा प्रभाव व्यक्तीसह देशावरही पडलेला पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जाते. हा एक शुभ योग मानला गेला असून, याचा प्रभाव उत्तम असल्याचे सांगितले जाते.