१७ दिवस बुध स्वगृही: ८ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; कमाई अपार, ३ ग्रहांची कृपा शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 03:03 PM2023-10-02T15:03:03+5:302023-10-02T15:03:03+5:30

बुधाने स्वराशीत विराजमान झाला असून, तुमच्यासाठी पुढील १७ दिवस कसे असू शकतील? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत विराजमान झाला आहे. १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत बुध कन्या राशीत असेल. बुध ग्रहाच्या सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेशाने त्रिग्रही योग जुळून येत आहे. आताच्या घडीला सूर्य आणि मंगळ ग्रह कन्या राशीत विराजमान आहेत. बुधच्या प्रवेशामुळे बुध आणि सूर्य यांचा बुधादित्य योग आणि बुध-सूर्य-मंगळ यांचा त्रिग्रही योग जुळून आला आहे.

बुध हा बुद्धिमत्ता, ज्ञान आणि तर्कशक्ती यांचा कारक ग्रह मानले जाते. कुंडलीत बुधाची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नशीबही साथ देते. कुंडलीत बुधाची स्थिती योग्य नसल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, असे म्हटले जाते.

कन्या राशीत बुधाचे संक्रमण देश आणि दुनियेसह मेष ते मीन या सर्व १२ राशींवर परिणाम करणारे ठरणार आहे. काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो, तर काही राशींना पुढील १७ दिवस सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धीचे जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: कामात काही अडथळे येऊ शकतात. नशिबाची साथ मिळेलच असे नाही. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. यश मिळविण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा नुकसान होऊ शकते. जोडीदाराशी समन्वय राखण्यात अडचण येऊ शकते.

वृषभ: नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. कामे पूर्ण करू शकाल. पैसे कमवण्यात यश मिळू शकेल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात खर्च होईल. कामातील कौशल्याचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. गुंतवणूक करायची असेल तर संक्रमण कालावधीत चांगला नफा मिळेल. काही खास लोकांशी भेट होऊ शकते, ज्याचा विशेष फायदा होऊ शकेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मिथुन: जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. नवीन आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. प्रतिकारशक्ती मजबूत होईल. नवीन मालमत्तेत गुंतवणूक केल्याने चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या सदस्याचा विवाह निश्चित होऊ शकतो, ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

कर्क: यश मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅनही कराल. जीवनात सुखसोयी वाढतील. अडकलेले पैसेही परत मिळतील. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामात दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांना या काळात चांगला आर्थिक फायदा होईल. इतर काही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकाल.

सिंह: नोकरदारांना मोठे पद मिळू शकते. उत्पन्न वाढेल. दुकान किंवा व्यवसाय चालवणार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास प्राधान्य देऊ शकाल. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. भावंडांशी संबंध दृढ होतील. संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल. मुलांच्या काही कामांमुळे धावपळ करावी लागेल, पण यश नक्कीच मिळेल.

कन्या: नशीब पूर्ण साथ देईल. कुटुंबातील सदस्यांचीही चांगली प्रगती होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरदारांना इतर एखाद्या कंपनीकडून कॉल येऊ शकतो, ज्यामुळे आनंद होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. पालकांसोबत तीर्थस्थळी जाण्याचा विचार कराल. सरकारी क्षेत्रातून चांगला आर्थिक नफा मिळू शकेल.

तूळ: भौतिक सुखसोयींवर भरपूर खर्च कराल. नवीन मालमत्तेमध्ये गुंतवणुकीतून नफा होईल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नोकरदार आणि व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. धनवृद्धीच्या शुभ संधी मिळतील. घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू करता येईल.

वृश्चिक: लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. समाधान मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यश मिळेल. नेतृत्व क्षमता आणि कार्यकुशलता दिसून येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर चांगला नफा मिळेल. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी.

धनु: व्यावसायिक संपर्क वाढवण्यात यशस्वी व्हाल. उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम जीवनात असलेल्यांना कुटुंबाकडून तुमच्या नात्याची ओळख मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. अतिउत्साहाने काम करणे टाळावे, अन्यथा चुका होऊ शकतात. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.

मकर: कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. अधिकाऱ्यांकडून योग्य मान्यता न मिळाल्याने करिअरमध्ये बदलाची योजना कराल. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या आणि बाहेरचे खाणे टाळा. भावंडांसोबत काही मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. आईच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. धार्मिक कार्याची आवड वाढेल.

कुंभ: वारसाहक्कातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता, त्यातून चांगला नफा मिळेल. जास्त बचत करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदार लोक सहकारी आणि अधिकारी यांच्यासमोर क्षमता सिद्ध करू शकतील. भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळ पुढे ढकला. कौटुंबिक जीवन चांगले राहील. घरासाठी काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता.

मीन: उत्साही वाटेल. पैसे कमावण्याच्या स्थितीत असाल. या काळात व्यवसायासाठी नवीन धोरणे शोधू शकतील. जोडीदारासोबतचे नाते सुधारण्यासाठी हा उत्तम काळ आहे, यामुळे दोघांमधील विश्वास आणि प्रेम मजबूत होईल. नोकरदारांना करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांना नफा मिळविण्यासाठी काही परदेशी दौरे करावे लागतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.