सूर्याचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींना धनलाभाच्या संधी; यश, प्रगतीसह फायदेशीर कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 10:16 AM2022-06-13T10:16:32+5:302022-06-13T10:20:37+5:30

Mithun Sankranti Sun Transit Gemini 2022: सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश म्हणजेच मिथुन संक्रांतीचा काळ काही राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या...

जून महिन्यात नवग्रहांच्या ५ ग्रहांच्या गोचरापैकी महत्त्वाचा बदल म्हणजे सूर्याचे राशीसंक्रमण. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (sun transit gemini 2022)

सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. १५ जून २०२२ रोजी सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला की, पुढील महिनाभर हा कालावधी मिथुन संक्रांत म्हणून ओळखला जाईल. सूर्याला नेतृत्व, तेजकारक मानले जाते. सूर्याचे कुंडलीतील स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. (surya gochar mithun rashi 2022)

सूर्य ग्रह शुभ किंवा लाभदायक स्थानी असेल, तर त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. सूर्य प्रतिकूल भावात असेल, तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेकविध उपायही सांगितले जातात. ते केल्याने सूर्याचा प्रतिकूल प्रभाव कमी करता येऊ शकतो, अशी मान्यता आहे. (mithun sankranti 2022)

सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाचा म्हणजेच मिथुन संक्रांतीचा सर्व बाराही राशीच्या व्यक्तींवर प्रभाव पडेल. मात्र, ५ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे मिथुन राशीतील संक्रमण शुभलाभदायक ठरू शकेल. मिथुन संक्रांतीचा काळ कोणत्या राशींना उत्तम ठरू शकेल? ते जाणून घेऊया...

सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश याच राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. या काळात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यातून नफाही मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर नेतृत्व करण्याची तुमची क्षमता लोकांना प्रभावित करेल. तथापि, मिथुन राशीच्या लोकांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत थोडे सावध राहावे. यावेळी, तुमच्या जोडीदारावर मते लादणे तुम्हाला जड जाऊ शकते.

मिथुन संक्रांतीचा काळ सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. या कालावधीत आर्थिक लाभ होऊ शकतात. ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांनी योग्य सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकेल. तुमची प्रतिष्ठाही वाढेल, तुम्ही राजकारणात असाल तर तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होऊ शकतात. काही लोकांना इच्छित ठिकाणी नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवू शकतात.

सूर्याचा मिथुन प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल. आगामी कालावधी फलदायक ठरू शकेल. बेरोजगारांना नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात. नोकरदार वर्गाला यश, प्रगतीचे मार्ग सुलभ होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना सूर्याचे संक्रमण शुभ राहील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

सूर्याचा मिथुन प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींना भाग्यकारक ठरू शकेल. उच्च शिक्षणात येणारे अडथळे आगामी काळात दूर केले जाऊ शकतात. व्यावसायिकांना कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. मात्र, प्रवास लाभदायक ठरू शकतात. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला भेटू शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांच्या प्रभावात आणि वैभवात वाढ होऊ शकेल.

मिथुन संक्रांतीचा कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. या काळात किरकोळ वाद होतील, परंतु यामुळे नातेसंबंध मजबूत होऊ शकतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आगामी कालावधीत उत्तम ठरू शकेल. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी वृद्धीकारक ठरू शकेल.