शुभ चतुर्ग्रही योग: ‘या’ ७ राशींना करिअर-नोकरीत यश, सुख-समृद्धीची वृद्धी; धनलाभाची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:08 AM2023-03-31T07:08:06+5:302023-03-31T07:08:06+5:30

चतुर्ग्रही योग सुमारे महिनाभर असून, काही राशींना आर्थिक आघाडीवर शुभ-लाभ प्राप्त होऊ शकतात. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

मार्च महिन्यात अनेक मोठे योग, संयोग जुळून आले होते. ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिन्यातही महत्त्वाचे ग्रह गोचर होत असून, मेष राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे. एप्रिलमध्ये ३ बड्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होत असून, एक ग्रह वक्री होणार आहे. सूर्य, गुरु आणि शुक्र राशीपरिवर्तन करणार आहेत. तर बुध ग्रह वक्री होणार आहे. मेष राशीत आताच्या घडीला राहु आणि शुक्र विराजमान आहेत.

३१ मार्च रोजी बुधाचा मेष राशीत प्रवेश झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बुध-राहु-शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून येईल. यानंतर शुक्र वृषभ राशीत विराजमान होईल. नवग्रहांचा राजा सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध-सूर्याचा बुधादित्य योग आणि बुध-सूर्य-राहुचा त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल.

तसेच नवग्रहांचा गुरु बृहस्पति ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. राहुशी गुरुची युती होऊन गुरु चांडाळ योग जुळून येईल. गुरु आगमनानंतर मेष राशीत गुरु, सूर्य, बुध आणि राहुचा चतुर्ग्रही योग जुळून येऊ शकेल. या ग्रहमानाचा तुमच्या नोकरी, करिअर, बिझनेस यांवर कसा प्रभाव असू शकेल? कोणत्या राशींना आगामी महिन्याभराचा काळ उत्तम ठरू शकेल? कोणत्या राशींना हा काळ काहीसा संमिश्र जाऊ शकेल? ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग शुभ वार्ता घेऊन येणारा ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. मान-सन्मान वाढेल. विरोधकांनाही विचार पटवून देता येतील. आर्थिक फायदा होईल. पण अपेक्षेपेक्षा कमी वाटू शकेल. सुख-समृद्धी योग जुळून येऊ शकतील. व्यवसायानिमित्त केलेल्या प्रवासात अपेक्षित यश मिळू शकते.

वृषभ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग खर्चात वाढ करणार ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची कवाडे खुली होऊ शकतील. काही प्रोजेक्ट्स करण्याची इच्छा होऊ शकेल. प्रवासाचे शुभ परिणाम दिसू शकतील. खर्च जास्त होऊ शकतो. कालांतराने वडीलधाऱ्यांच्या मदतीने जीवनात सुख-शांती लाभू शकेल. आर्थिक लाभ होऊ शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग शुभ संकेतांचा ठरू शकेल. प्रवासात फायदा होईल. मौल्यवान वस्तुंची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, करिअरमध्ये अडचणी वाढू शकतात. दुसरीकडे, आर्थिक लाभ होऊ शकेल. सुख-समृद्धी योग जुळून येऊ शकतील. मान-सन्मान वाढेल. धनाच्या आगमनाचे शुभ संयोग घडून येऊ शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग अनुकूल ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी एक नवीन सुरुवात आनंद आणि समृद्धीची जोड देऊ शकेल. यशस्वी होऊ शकाल. आर्थिक लाभ होऊ शकतील. सुख-शांतता लाभू शकेल. प्रवासात शुभ संदेश प्राप्त होऊ शकतील.

सिंह राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग भाग्यकारक ठरू शकेल. नशिबाची साथ लाभू शकेल. आर्थिक बाबतीत आश्वासने पूर्ण होतील असे नाही. बॅक अप प्लॅन घेऊन पुढे जाणे हिताचे ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर पुढे जाता येऊ शकेल. प्रवासाचे शुभ परिणाम दिसून येऊ शकतील. कालांतराने काही प्रमाणात धनहानी होण्याची शक्यता आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग सकारात्मक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक घेतलेले निर्णय अनुकूल ठरू शकतील. आर्थिक बाबतीत स्वतःच्या विचारावर ठाम राहिल्यास चांगले परिणाम दिसून येऊ शकतील. संयम ठेवून निर्णय घेतल्यास आनंद आणि सुसंवाद घडू शकेल. एखाद्या महिलेची मदत मोलाची ठरू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकेल. फायदा होऊ शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती करणे शक्य होऊ शकेल. नियोजन करून पुढे गेल्यास यश मिळू शकेल. आर्थिक बाबींमध्ये अनुकूलता येऊ शकेल. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये चांगली समज असलेल्या व्यक्तीकडून मदत घेतली जाऊ शकते. काही ठोस निर्णय घेतल्यास जीवनात आनंद वाढू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग आनंददायी ठरू शकेल. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल असून, आर्थिक लाभ होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक घेतलेले निर्णय अनुकूल ठरू शकतील. सुखद अनुभव मिळतील. मात्र, एखाद्या निर्णयामुळे अस्वस्थता वाढू शकते.

धनु राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग अनुकूल ठरू शकेल. आर्थिक लाभाची मजबूत परिस्थिती निर्माण होऊ शकेल. गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. त्या सुधारण्यासाठी काही ठोस निर्णयही घेऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी काही कामे पूर्ण होऊन यशाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. अनावश्यक वाद टाळा. एखादे काम पूर्ण होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करावे लागू शकतील.

मकर राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग सकारात्मक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. सकारात्मक बातम्या मिळू शकतात. सुख आणि समृद्धी मिळण्याच्या अनेक संधी मिळू शकेल. आनंददायी वेळ घालू शकाल. शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग चांगला ठरू शकेल. काही कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतील. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल राहू शकेल. धनप्राप्ती होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी अचानक यश मिळू शकते. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मीन राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाने शुभ परिस्थिती निर्माण होऊ शकतील. सुख-समृद्धीचे शुभ योग जुळून येऊ शकतील. आनंददायी वेळ घालवू शकाल. प्रवास यश मिळवून देऊ शकेल. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. एखादा महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलणे चांगले. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.