Navpancham Rajyog 2024: १०० वर्षांनी नवपंचम राजयोग, दसऱ्यापूर्वीच 'या' राशींचे भाग्य करणार सीमोल्लंघन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:27 PM2024-10-07T13:27:42+5:302024-10-07T13:33:05+5:30

Navpancham Rajyog 2024: जर कुंडलीत नवपंचम राजयोग (Navpancham Rajyoga 2024) असेल तर त्या व्यक्तीला धन, संपत्ती, आर्थिक लाभ मिळू शकतो. ८ ऑक्टोबर रोजी नवपंचम राजयोग तयार होत आहे. हा योग जवळपास १०० वर्षांनंतर तयार होत असल्याने या दुर्मिळ योगाचा परिणाम १२ ही राशींवर दिसून येईल! सध्या नवरात्र (Navratri 2024) सुरू आहे आणि आता १२ ऑक्टोबर रोजी दसरा (Dussehara 2024)! या दिवशी आपण सोनं वाटप करतो, मात्र या योगामुळे दसर्‍याआधीच संबंधित राशींना शुभ काळ येत असल्याचे दिसून येते.

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि शनि या ग्रहांचा विशेष संयोग १०० वर्षांनंतर तयार होतो, त्याला नवपंचम राजयोग म्हणतात. हा दुर्मिळ योगायोग बाराही राशींवर परिणाम करेल, परंतु तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप खास असणार आहे. खास म्हणजे नेमकं काय आणि इतर राशींच्या बाबतीत काय हेही जाणून घेऊ.

शुक्र ग्रह हा आनंद, वैभव आणि प्रेमाचा कारक आहे, तर शनि ग्रह कृती आणि संयमाचा कारक आहे. नवपंचम राजयोगात या तिन्ही राशींमध्ये दोन्ही ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या लोकांना इतर राशींच्या तुलनेत अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी कोणते उपाय करायला हवे आणि इतर राशीच्या लोकांनी कोणता सावध पवित्रा घ्यायला हवा ते जाणून घेऊ.

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी हा योग नवीन संधी, करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि वैयक्तिक विकास देईल. मेष राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळेल, तर मिथुन राशीच्या लोकांना अद्वितीय कार्य करण्याची संधी आहे. कर्क राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील, सिंह राशीच्या लोकांची नेतृत्व क्षमता विकसित होईल आणि कन्या राशीच्या लोकांना ज्ञान मिळविण्याच्या नवीन संधी मिळतील.

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठीही हा योग शुभ राहील. तूळ राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ आनंददायी राहील, वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल, धनु राशीचे लोक प्रवास करतील. मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती होईल, कुंभ राशीच्या लोकांना नवीन मित्र मिळतील आणि मीन राशीच्या लोकांना आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. यावेळी धीर धरा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या.