नवपंचम योग! ‘या’ ५ राशींना राजयोगाचा लाभ, नोकरीत बढती; गुंतवणुकीतून फायदा, यशाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:27 PM2022-11-16T12:27:49+5:302022-11-16T12:38:40+5:30

गुरु आणि शुक्र ग्रहांचा जुळून येत असलेला नवपंचम शुभ योग काही राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या...

ज्योतिषीय दृष्टिकोनातून नोव्हेंबरचा महिना अतिशय शुभ ठरणारा आहे. सूर्य, बुध, शुक्र या ग्रहांच्या वृश्चिक प्रवेशानंतर अनेकविध प्रकारचे अद्भूत, दुर्मिळ योग जुळून येत आहेत. त्रिग्रही, लक्ष्मीनारायण, बुधादित्य, अष्टलक्ष्मी अशा योगांनंतर आता नवपंचम योग जुळून येत आहे. (navpancham yog november 2022)

नवपंचम योग हा अन्य योगांपैकी शुभ आणि महत्त्वाचा मानला जात आहे. शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत आहेत. तर गुरु ग्रह स्वराशीत म्हणजेच मीन राशीत मार्गी आहे. यामुळे हा नवपंचम योग जुळून येत आहेत. हे ग्रह एकमेकांपासून पाचव्या स्थानी असल्यामुळे हा योग जुळून येत आहे. (guru shukra shubh yoga 2022)

या योगामुळे नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये चांगले तसेच सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना नवपंचम योगाचा शुभ-लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना नवपंचम योगाचा उत्तम फायदा होऊ शकेल. करिअरमध्ये खूप लाभ देईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती, पगार वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. विशेषतः परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. राजकारणात असलेल्यांना पदे मिळू शकतात.

मिथुन राशीच्या व्यक्तींना नवपंचम योग फायदेशीर सिद्ध होईल. कोर्टात काही प्रकरण असेल तर त्यात यश मिळेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. व्यवसायात धनलाभ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना नवपंचम योग अनुकूल ठरू शकेल. आगामी काळात नशिबाची साथ मिळेल. कामात यश मिळेल. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. प्रवास करू शकतो. गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींना नवपंचम योग लाभदायक ठरू शकेल. संवाद कौशल्याच्या जोरावर कामे होऊ शकतात. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना नवपंचम योग सकारात्मक ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसाय दोन्हीसाठी वेळ उत्तम आहे. काही बदल होऊ शकतात, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. थांबलेली कामे होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.