Navratri 2022: नवरात्रोत्सव: नवदुर्गेचे गजारुढ आगमन; ‘या’ ९ राशींवर अपार कृपा, देवी शुभच करणार! By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 01:46 PM 2022-09-20T13:46:25+5:30 2022-09-20T13:54:38+5:30
Navratri 2022 Astrology Predictions: यंदाचा नवरात्रोत्सव काही राशीच्या लोकांसाठी अतिशय खास ठरू शकतो. कोणत्या राशींना देवीचे शुभाशिर्वाद मिळू शकतील? जाणून घ्या... चातुर्मासातील गणेशोत्सवानंतर महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध स्वरुपांचे पूजन केले जाते. देवीचे पूजन, नामस्मरण, भजन उपासना करण्यासाठी नवरात्राचा काळ सर्वोत्तम मानला जातो. यंदा २०२२ रोजी २६ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र साजरे केले जाणार आहे. ०५ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने नवरात्रीची सांगता होईल. (navratri 2022 astrology)
यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे संपूर्ण नऊ दिवस नवरात्र साजरे केले जाणार आहे. नवरात्रात एकही तिथी क्षय होणार नाही. जेव्हा नवरात्र ९ दिवस साजरे केले जाते, ते कल्याणकारी, शुभ ठरणारे असते, असे म्हटले जाते. या वेळी नवरात्रात सर्वार्थ सिद्धी नामक शुभ योग आहे. यासोबतच अमृत सिद्धी योगही प्रभावी होणार आहे. या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की, या दिवशी हस्त नक्षत्र संपूर्ण दिवस राहील. (shardiya navratri 2022 astrology predictions)
यंदा दुर्गा देवी हत्ती वाहनावर आरुढ होऊन म्हणजेच गजारुढ स्वरुपात पृथ्वीवर येईल. याच वाहनावर आरुढ होऊन दुर्गा देवी परत जाईल, असे सांगितले जात आहे. दुर्गा देवीचे हत्ती वाहन अतिशय शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नवदुर्गेचे होणारे आगमन कोणत्या राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकेल. नवरात्रोत्सवाचा काळ कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक आणि देवीची कृपा राहणारा ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला काही कामे काळजीपूर्वक आणि सावधगिरीने करावी लागतील. परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. भविष्यात त्याचा चांगला फायदाही होईल. खर्चांकडे लक्ष द्यावे, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. देवीच्या कृपेने तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल. सामाजिक संबंधही वाढतील.
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन चांगले ठरू शकेल. देवीचे शुभाशिर्वाद मिळू शकतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावाल. तुमची कामे सकारात्मक दृष्टिकोन आणि संयमाने पूर्ण करू शकाल. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक न होण्याचा सल्ला दिला जात आहे. तुमच्या योजना चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांनाही देवीचा आशीर्वाद मिळेल. उत्पन्नात चांगली वाढ होईल.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन अनुकूल ठरू शकेल. देवी दुर्गेची असीम कृपा राहील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचे उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतील. नोकरी आणि व्यवसाय करणारे लोक त्यांचे ध्येय पूर्ण करतील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. तुमच्या यशाची चौफेर चर्चा होईल.
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन सकारात्मक ठरू शकेल. देवीचे आशीर्वाद पाठिशी असतील. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. सासरच्या मंडळींशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर देवी कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबाच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. आजूबाजूचा ताण आणि नकारात्मक प्रभाव तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि परिणामावर विपरित परिणाम करू शकतात, त्यामुळे तुमचे काम योग्य पद्धतीने पूर्ण करावे.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन मध्यम फलदायी ठरू शकेल. तुम्हाला आक्रमकता टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. कामासोबतच कुटुंब आणि आरोग्याची काळजी घ्यावी. देवी कृपेने तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतील. त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धीही मिळेल. भावंडांची साथ मिळेल. परंतु, मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन उत्तम ठरू शकेल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर अधिक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. विवाहेच्छुकांना चांगली बातमी मिळू शकेल. अनोळखी किंवा नवीन लोकांसोबत आर्थिक निर्णय घेण्याची घाई करू नये.
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन इच्छा पूर्ण करणारे ठरू शकेल. तुमचे सामाजिक परिघ वाढेल. धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्याल. देवी कृपेने प्रेम जीवन सकारात्मक आणि आनंदी होईल. विरोधकांना कमी लेखू नका, असा सल्ला दिला जातोय. कामे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करा. घरातील सदस्यांशी संबंधांबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. नोकरदारांचे त्यांच्या टीमशी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन मंगलमय ठरू शकेल. घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन करता येईल. जुन्या गुंतवणुकीतून काही चांगल्या रिटर्नची अपेक्षा करू शकता. कामाच्या ठिकाणी काही गुंतागुंत होऊ शकते. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते घट्ट होईल आणि तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन चिंतामुक्तीचे ठरू शकेल. आशावादी दृष्टीकोन असल्यास, गोष्टी सहजतेने जाऊ शकतात. अविवाहित आहेत, त्यांची या काळात एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. सामाजिक परिघ वाढेल आणि लोकांमधील प्रतिमा सुधारेल. घरातील तणावपूर्ण परिस्थिती सहजपणे हाताळू शकाल. व्यवसायात, तुम्ही आर्थिक अपेक्षा करू शकता आणि तुमचे प्रेम जीवन हळूहळू आनंदी होईल.
मकर राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन सकारात्मक ठरू शकेल. आगामी काळात अनेक सुधारणा दिसतील. सकारात्मक विचारांनी प्रत्येक समस्येवर मात करू शकाल. तुमच्या मनात आनंद आणि उत्साहाची भावना राहील. सर्जनशील क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. मित्रांसोबत संबंध चांगले राहतील. परंतु तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल तर ते अंमलात येईपर्यंत गुप्त ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन यशकारक ठरू शकेल. करिअरचा आलेख तुम्हाला नव्या उंचीवर नेणारा ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. प्रत्येक कामात त्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या संपू शकतील. काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करू शकाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहाल. मित्रांची मदत उपयुक्त ठरू शकेल. गुंतवणुकीमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकाल.
मीन राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे गजारुढ आगमन सामान्य ठरू शकेल. प्रत्येक कामात सक्रियता राहील. समाजात आणि कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. घरामध्ये धार्मिक कार्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल. तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल, तर यश मिळू शकेल. वडिलांसोबत काही गैरसमजामुळे वाद होण्याची शक्यता आहे, मात्र संवादातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.